हास्यजत्रा : महेश मांजरेकरांचा ग्रँड परफॉर्मन्स | पुढारी

हास्यजत्रा : महेश मांजरेकरांचा ग्रँड परफॉर्मन्स

पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील ‘ महाराष्ट्राची हास्यजत्रा ‘ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यांमध्ये अनेक दिग्गज नामवंतांचा समावेश आहे. मोठमोठे कलाकार हास्यजत्रेच्या मंचावर हजेरी लावत आहेत. येत्या ११ आणि १२ फेब्रुवारीला चाहत्यांना महेश मांजरेकरांचा ग्रँड परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे.

हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला चाहत्याचं प्रेम मिळत आहे. समीर-विशाखा, प्रसाद-नम्रता, गौरव-वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यवीरांनी मिळून आपल्या विनोदांनी आणि प्रहसनांनी चाहत्यांना नवी उमेद दिली आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि चाहत्याच्या पसंतीस उतरलेल्या ‘पांघरूण’ या चित्रपटाच्या टीमने हास्यजत्रेच्या मंचावर आली होती. यानिमित्ताने प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर, गौरी इंगवले, अमोल बावडेकर ही मंडळी येथे उपस्थित होती.

यावेळी हास्यजत्रेतील स्किटमध्ये महेश मांजरेकर स्वतः सहभागी झाले. “मी न चुकता हास्यजत्रेचे सर्व भाग पाहतो आणि मला हा कार्यक्रम खूप आवडतो;” असं ते यावेळी म्हणाले. त्यांना हास्यजत्रेच्या मंचावर पाहणं ही चाहत्यासाठी पर्वणी ठरणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button