Shweta Tiwari : 'ब्रा'वरून गंदी बात, अडचणीत येणार श्वेता तिवारी? | पुढारी

Shweta Tiwari : 'ब्रा'वरून गंदी बात, अडचणीत येणार श्वेता तिवारी?

पुढारी ऑनलाईन

प्रसिध्द टीव्ही अभिनेत्री आणि कसौटी जिंदगी मधून घराघरात पोहोचलेली श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ब्रा आणि देवाबद्दल आक्षेपार्ह विधान करून चर्चेत आलीय. (Shweta Tiwari)

भोपाळ (मध्य प्रदेश) येथे तिने ब्रा साईज आणि देवाबद्दल वादग्रस्त विधान केले. वास्तविक, बुधवारी श्वेता तिच्या आगामी वेब सीरीजच्या घोषणेसाठी भोपाळला पोहोचली होती. तिथे ती आपल्या संपूर्ण टीमसह पत्रकार परिषदेत सहभागी झाली होती. यावेळी तिची जीभ घसरली. तिथे तिने प्रसारमाध्यमांसमोर ‘मेरी ब्रा का साईज भगवान भी ले रहे है’ असे वक्तव्य केले. तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाला.

श्वेता आणि रोहित रॉय सारखे सेलिब्रिटी काल भोपाळमध्ये फॅशनशी संबंधित वेब सीरीज शो स्टॉपर ची घोषणा करण्यासाठी गेले होते. यावेळी बोलताना तिने गंमतीने अंतर्वस्त्र आणि देवाबद्दल वादग्रस्त विधान केले. या तिच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अंतर्वस्त्रबाबत वादग्रस्त विधानावरून ती निशाण्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, भोपाळमध्ये या वेबसीरीजचे शूटिंग होणार आहे.

याआधीही कौटुंबिक वादावरून श्वेता चर्चेत आली होती. आधी तिचा पती राजा चौधरी आणि नंतर दुसरा पती अभिनव कोहलीशी वादामुळे ती चर्चेत राहिली होती.

श्वेताने स्टंट बेस्ड रिॲलिटी शो ‘खतरों के खिलाडी -११’ मध्ये सहभागी झाला होता. ती फिनालेपर्यंत पोहोचली होती.

श्वेताने आपल्या अभिनय करिअरची सुरूवात छोट्य पडद्यावरील मालिका दुश्मनमधून केली होती. पण, ती लोकप्रिय झाली ती बालाजी टेलीफिल्म्सची मालिका कसौटी जिंदगीमधून. नंतर ती अनेक मालिकांमध्ये दिसली. तिने अनेक रिॲलिटी शोजमध्ये भाग घेतला होता. इस जंगल से मुझे बचाओ आणि बिग बॉस सारख्या शोमध्येही ती दिसली.

तिने छोट्या पडद्यांशिवाय भोजपुरी सिनेमामध्येही काम केलं आहे. याशिवाय हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. छोट्या पडद्यावरील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

Back to top button