kartik aryan : कार्तिक ठरला वरचढ | पुढारी

kartik aryan : कार्तिक ठरला वरचढ

पुढारी ऑनलाईन

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा ः द राईज’ला मिळालेल्या यशानंतर त्याचा ‘अला वैकुंठपुरमलो’ हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित करण्याची घोषणा निर्मात्यांनी केली होती. तथापि, या चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक ‘शहजादा’ सध्या बनवला जात आहे आणि यात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे; पण मूळ चित्रपट हिंदीत रीलिज केल्यास ‘शहजादा’ला फटका बसला असता. त्यामुळेच कार्तिकने थेट चित्रपट सोडण्याची धमकी दिली. त्यानंतर आता ‘अला वैकुंठपुरमलो’ हिंदीत रीलिज होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कार्तिकच्या तीन चित्रपटांनी 100 कोटींचा व्यवसाय केला आहे. तो आता इंडस्ट्रीत ए लिस्ट अभिनेत्यांच्या यादीकडे वेगाने जात आहे. त्यामुळे कार्तिकचे करिअर खराब करण्यासाठी इंडस्ट्रीतील एक लॉबी खूप काळापासून सक्रिय असल्याची चर्चा आहे. चित्रपट स्वीकारताना मूळ चित्रपट हिंदीत रीलिज करण्याबाबतची कल्पना कार्तिकला दिली नव्हती. त्यामुळेच कार्तिकने चित्रपट सोडण्याची धमकी दिल्यावर आता तो निर्णय मागे घेण्यात आला आहे. ‘शहजादा’चे दिग्दर्शन रोहित धवन करत असून यात कृती सेननही आहे. दरम्यान, कार्तिक आणि कियारा अडवाणीचा ‘भूलभुलैया 2’ 25 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

Back to top button