South Actors in Bollywood : दाक्षिणात्य कलाकार बॉलिवूडमध्ये करणार डेब्यू - पुढारी

South Actors in Bollywood : दाक्षिणात्य कलाकार बॉलिवूडमध्ये करणार डेब्यू

पुढारी ऑनलाई डेस्क

सध्या बॉलिवूडमध्ये फक्त आणि फक्त दाक्षिणात्य ( South Actors in Bollywood ) कलाकारांचीच क्रेझ अनुभवायला मिळत आहे. जेव्हा पासून दाक्षिणात्य चित्रपट पॅन इंडिया धर्तीवर रिलीज होत आहेत. तेव्हा पासून दाक्षिणात्य कलाकारांची क्रेझ बॉलिवूड आणि संपूर्ण भारतातील रसिकांवर निर्माण झाली आहे. बाहुबलीद्वारे अभिनेता प्रभास आणि आता ‘पुष्पा’ द्वारे अल्लू अर्जुन हे संपूर्ण भारतातील मेगा स्टार झाल्याची स्थिती आहे. प्रभासने आपल्या प्रसिद्धीचा फायदा घेत बॉलिवूडमध्ये यशस्वी पाय रोवले आहेत. आता त्याच्या पाठोपाठ अनेक दाक्षिणात्य कलाकरांनी आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला आहे. किंबवुना बॉलिवूडचे निर्माते देखिल दाक्षिणात्य कलाकारांची मागणी करत आहेत. या वाढत्या मागणीमुळे हे सात दाक्षिणात्य कलाकार आता बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

South Actors in Bollywoodरश्मिका मंदाना  ( South Actors in Bollywood )

सध्या दक्षिणेतील प्रतिभावान अभिनेत्री रश्मिका मंदाना ही तर फक्त दाक्षिणात्य चित्रपटाने नॅशनल क्रश ठरली आहे. तिच्या ‘गिता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटांनी इतकी लोकप्रियता मिळवली की तिचे उत्तर भारतात देखिल मोठ्या प्रमाणात चाहते निर्माण झाले आहे. सध्याचा तिचा ‘पुष्पा’ चित्रपट तर लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला आहे. तर रश्मिका सध्या बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी तयार झाली. ‘मिशन मजनू’ या चित्रपटाद्वारे ती बॉलिवूडमध्ये प्रवेश करत आहे. या चित्रपटात ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सोबत काम करताना दिसणार आहे. तर ‘गुडबाय’ हा दुसरा चित्रपट देखिल ती करत आहे. विकास बहल हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. तर यात रश्मिका बीग बी अमिताभ यांच्या सोबत काम करताना दिसणार आहे.

South Actors in Bollywood

विजय सेतुपती  ( South Actors in Bollywood )

दक्षिणेतील हा खूपच प्रभावान अभिनेता आहे. अवघा साऊथ याची स्तुती करताना कधीच थकत नाही. खुद्द रजनिकांत या नटाला फॉलो करतात आणि याचं तोंड भरुन कौतक करतात. याच्या दक्षिणेतील अनेक चित्रपटाच्या हिंदी डब सिनेमांना उत्तरेतील रसिकांनी डोक्यावर घेतले आहे. मास्टर, विक्रम वेदा, पेटा या सारख्या चित्रपटातील अभिनयांनी रसिक मंत्रमुग्ध झाले आहेत. तर विजय सेतुपती आता ‘मुंबईकर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘मानगरम’ या तमिळ चित्रपटाचा हा रिमेक आहे. हा चित्रपट २०२१ मध्येच येणार होता. पण, कोरोनामुळे त्याला उशिर होत आहे. तसेच यानंतर ‘मेरी ख्रिसमस’ हा दुसरा चित्रपट विजय सेतुपती करत आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे. या चित्रपटाला श्रीराम राघवन दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटात विजय सोबत कॅटरिना कैफ सुद्धा असणार आहे.

South Actors in Bollywood

विजय देवराकोंडा

खरं तर या अभिनेत्याची ओळख करुन देणे हेच हास्यास्पद ठरणार आहे. कारण ‘गिता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ या दक्षिणात्य चित्रपटातून तो भारतातल्या घराघरात पोहचला आहे. तसेच त्याच्या ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाने तरुणांवर अधिराज्य केले आहे. शिवाय याच चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘कबीर सिंग’ देखिल खूपच हिट ठरला होता. खरतर ‘कबीर सिंग’ या चित्रपटासाठी  दिग्दर्शकाची पहिली पसंद हा विजय देवराकोंडा होता. पण, त्याने पुन्हा तोच रोल करण्यासाठी नकार दिला. नाहीतर तेव्हाच विजय हा बॉलिवूडमध्ये आला असता. पण त्याने अनेकवेळा बॉलिवूडमध्ये काम करण्यास नापंसती दर्शवली होती. त्याची प्रसिद्धी येवढी वाढली आहे की बॉलिवूडकरांना तो हवा आहे. म्हणून करण जोहरने अगदी विनंत्यावर विनंत्या करुन त्याला बॉलिवूडमध्ये आणला आहे. सध्या त्याचा पहिला वहिला ‘लायगर’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. याचा टिझर देखिल लोकप्रिय झाला आहे. या चित्रपटात तो एका बॉक्सरची भूमिका करत असून त्याच्या सोबत अनन्या पांडे सुद्धा दिसणार आहे.

South Actors in Bollywood

नयनतारा

दाक्षिणात्य सिनेमातील लेडीसुपरस्टार अशी बिरुद मिरवणारी ही अनुभवी अभिनेत्री आहे. मुळची दाक्षिणात्य असली तरी संपूर्ण भारतात या अभिनेत्रीला ओळखले जाते. दक्षिणेतील तमाम सुपरस्टार सोबत हिने काम केले आहे. सध्या शाहरुख खान तामिळ दिग्दर्शक एटली सोबत आपल्या पुढच्या चित्रपटावर काम करत आहे. सध्या या चित्रपटास तात्पुरचे ‘जवान’ असे नाव देण्यात आलेले आहे. या चित्रपटात शाहरुख सोबत नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात विजय सेतुपती याचा देखिल कॅमिओ रोल असणार आहे. तर बघुया बॉलिवूडचा बादशहा तसेच किंग खान आणि साऊथ लेडीसुपरस्टार नयनतारा ही जोडी काय धमाल घालते.

South Actors in Bollywood

नागा चैतन्य

दाक्षिणात्य सुपरस्टार पैकी एक नागा चैतन्य आहे. तसेच सुपरस्टार नागा अर्जुन याचा मुलगा. दक्षिणेत याची स्वतंत्र ओळख आणि फॅन फॉलोईंग आहे. शिवाय याच्या चित्रपटाचे हिंदी डब सर्वत्र घुमतात. नागा चैतन्य अमिर खान याच्या फॉरेस्ट गम्प या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये येत आहे. खरंतर हा सिनेमा विजय सेतुपती करणार होता, पण त्याच्या तारखांच्या व्यस्थतेमुळे त्याला चित्रपट सोडावा लागला. मग खुद्द अमिर खान याने नागा चैतन्यला फोन करुन या चित्रपटाची ऑफर दिली आणि अमिरच्या प्रेमापोटी त्याने हा चित्रपट स्विकारला. नागा अर्जुनने एक काळ बॉलिवूडमध्ये गाजवला आहे. पण फार काळ तो इथे रमला नाही. आता पाहुया नागा चैतन्य बॉलिवूडवर काय प्रभाव पाडतो.

शालिनी पांडे

तुम्हाला अर्जुन रेड्डी हा विजय देवराकोंडाचा चित्रपट आठवत असेल. तर या चित्रपटात तुम्ही विजय देवराकोंडा सोबत शालिनी पांडे हिला पाहिले होते. तर शालिनी पांडे ही रणवीर सिंहच्या ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये येत आहे. तसेच ‘महाराजा’ हा दुसरा हिंदी सिनेमा देखिल ती करत आहे. या चित्रपटाद्वारे अमिर खान याचा मुलगा जुनेद बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

मंजु वॉरिअर

‘असुरण’ आणि ‘लुसिफर’ या चित्रपटांद्वारे प्रसिद्धी झोतात आलेली ही मल्याळम गुणी अभिनेत्री आहे. मंजु वॉरिअर ही ‘अमेरिकी पंडित’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत आहे. या चित्रपटात ती आर. माधवन सोबत काम करताना दिसणार आहे.

Back to top button