अलका कुबल यांची मुलगी ईशानीचा थाटात लग्नसोहळा | पुढारी

अलका कुबल यांची मुलगी ईशानीचा थाटात लग्नसोहळा

पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री अलका कुबल यांची मुलगी ईशानी हिचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. अलका कुबल यांना ईशानी आणि कस्तुरी या दोन मुली आहेत. ईशानी पायलट आहे. तिला २०१५ मध्ये वैमानिकाचं ‘लाईफटाईम लायसन्स’ मिळालं आहे.

कोण आहे ईशानीचा जोडीदार?

ईशानी सध्या मियामी, फ्लोरिडा येथे राहते. तेथेच तिची आणि निशांतची ओळख झाली. पुढे मैत्री झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ईशानीने दिल्लीतील निशांत वालिया याच्याशी लग्न केलं. काही दिवसांपूर्वीच निशांत-ईशानीचा रोका सेरेमनी पार पडला होता.

पायलट आहे ईशानी

ईशानीला शाळेत असल्यापासून पायलट व्हायचं होतं. त्यानुसार तिने शिक्षण घेतले. तिने २०१५ मध्ये तिने अमेरिकेत पायलटचं अधिकृत लायसन्स मिळवलं.  ती भारतात परतली. २०१७ मध्य़े भारतात तिने लायसन्स मिळवलं.

ईशानीच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्न समारंभातील फोटो आणि कुटुंबीयांचे फोटोदेखील चर्चेत आहेत. अलका यांच्या इन्स्टाग्रामवरदेखील काही फोटो पाहायला मिऴत आहेत. तसेच लग्नसोहळ्याचे फोटो अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तसंच अलका यांनीही त्यांच्या इन्स्टा स्टोरीमध्ये हे फोटो पोस्ट केले आहेत. या लग्नसोहळ्यात मिलिंद गवळी, किशोरी शहाणे आणि तिचे पती, अर्चना नेवरेकर, स्मिता जयकर, प्राजक्ता दिघे, निर्मिती सावंत हे कलाकार उपस्थित होते.

हेही वाचलं का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Alka Kubal Athalye (@alkakubal_23)

 

View this post on Instagram

 

A post shared by Alka Kubal Athalye (@alkakubal_23)

 

View this post on Instagram

 

A post shared by Alka Kubal Athalye (@alkakubal_23)

Back to top button