रोहित-फरहानचे मिशन फ्रंटलाईन - पुढारी

रोहित-फरहानचे मिशन फ्रंटलाईन

पुढारी ऑनलाईन

अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक फरहान अख्तर आणि निर्माता-दिर्ग्शक रोहित शेट्टी हे आता एकत्रित काम करणार आहेत. डिस्कव्हरी प्लसचा शो ‘मिशन फ्रंटलाईन’मध्ये हे दोघेही दहशतवादविरोध प्रशिक्षण घेताना दिसणार आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष अभियान ग्रुपसोबत हे दोघेही एक दिवस व्यतित करणार आहेत.

फरहानला राष्ट्रीय रायफल्ससोबत शोधमोहीम आणि स्फोटके नष्ट करण्यासह स्टील फायरिंग, जंगलात दहशतवाद्यांच्या कारवाया निष्प्रभ करणे आणि शस्त्रास्त्र प्रशिक्षण हे सर्व करावे लागणार आहे.

फरहानने यावेळी त्याच्या ‘लक्ष्य’ या चित्रपटाच्या आठवणींनाही उजाळा दिला. 20 जानेवारीपासून हा कार्यक्रम डिस्कव्हरी प्लसवर सुरू होत आहे.

Back to top button