Gehraiyaan : ‘गहराईयाँ’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रीलीज - पुढारी

Gehraiyaan : ‘गहराईयाँ’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रीलीज

पुढारी; ऑनलाईन डेस्क : चित्रपटातील काही हॉट फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चा झालेल्या ‘गहराईयाँ’ ( Gehraiyaan ) या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रीलीज झाला आहे. दीपिका पदुकोन, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे, धैर्य करवा यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. बहिणीच्या बॉयफ्रेंडच्या प्रेमात पडलेल्या महिलेची भूमिका दीपिकाने यात केली आहे.

अनन्या दीपिकाची बहिण तर सिद्धांत तिचा बॉयफ्रेंड आहे. तर धैर्य करवा दीपिकाचा पती आहे. ट्रेलरमध्ये अनेक रोमँटिक, बोल्ड दृश्येही दिसून येतात. दीपिकाने हा ( Gehraiyaan ) ट्रेलर सोशल मीडियातून शेअर करताना ‘जिंदगी, प्यार और विकल्प… चला सगळ्याचाच अनुभव घेऊया…’ असे लिहिले आहे.

आधुनिक नातेसंबंधांतील गुंतागुंतीची ही कहाणी आहे. शकुन बत्रा दिग्दर्शित हा ( Gehraiyaan ) चित्रपट 11 फेब्रुवारी रोजी अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रीलीज होणार आहे. चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

या चित्रपटातबाबत दीपिका म्हणाली की, या चित्रपटात मी अलिशा नावाचे व्यक्तीची भूमिका केली आहे. हे पात्र माझ्या खूपच जवळचे आहे. आता पर्यंत मी जी पात्रे मी केली आहेत त्या पैकी हे एक आहे. अनेक आव्हानांचा सामना करणारे आणि गमतीदार असणारे पात्र मला साकारायला आवडतात. मी भाग्यशाली आहे की हे पात्र करण्याची मला संधी मिळाली. या चित्रपटातील सर्व पात्रांचा संघर्ष आणि एक प्रवास अत्यंत जीवंत वाटणारा व खऱ्या आयुष्यातील व्यक्तीरेखांपर्यंत पोहचणारा आहे. सामन्य लोकांशी जोडलेल्या आणि गुंतागुतीचा नातेसंबधांचा अनुभव तुम्ही या चित्रपटाद्वारे पहाला असे देखिल दीपिकाने आपल्या भूमिकेबाब सांगितले.

Back to top button