आषाढी एकादशी : सावळे सुंदर रूप मनोहर अल्बममध्ये दिसणार निशिगंधा वाड | पुढारी

आषाढी एकादशी : सावळे सुंदर रूप मनोहर अल्बममध्ये दिसणार निशिगंधा वाड

मुंबई; पुढारी ऑनलाईन : आषाढी एकादशी निमित्त सावळे सुंदर रूप मनोहर अल्बम सॉन्गमध्ये पहिल्यांदाच निशिगंधा वाड दिसणार आहे. वारकऱ्यांना पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागते. वारकऱ्यांसाह संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातील उत्कट भावना ‘सावळे सुंदर रूप मनोहर’ या गाण्यातून उलगडण्यात आल्या आहेत.

अधिक वाचा –

या अप्रतिम गाण्याची निर्मिती सॉंग सिटी मराठी आणि शशिकांत वळतकर यांनी केली आहे. तर अजित पाटील यांनी दिग्दर्शित केले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड या गाण्याच्या माध्यमातून पहिल्यांदाच एका अल्बम सॉन्गमध्ये दिसणार आहेत.

अधिक वाचा – 

‘सावळे सुंदर रूप मनोहर’ या गाण्याची निर्मिती अभिनेते दीपक देऊळकर यांच्या संकल्पनेतून झाली आहे.

अधिक वाचा- 

संगीतकार श्रीकृष्ण चंदात्रे यांनी ‘सावळे सुंदर रूप मनोहर’ संगीतबद्ध केले आहे. सोनाली चंदात्रे यांनी आपला सुमधुर आवाज दिला आहे.

कलादिग्दर्शन वैभव शिरोळकर, छायांकन साईनाथ माने यांनी केले आहे. संकलन अमोल निंबाळकर यांनी केले आहे.

अजित पाटील म्हणाले…

आम्ही सावळे सुंदर रूप मनोहर हे गाणे मराठी माणसांच्या भेटीला आणत आहोत.

या गाण्याच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी एका अल्बम सॉंग साठी काम केले आहे,

त्यांच्या व्यस्त शेड्यूल मधून त्यांनी या गाण्यासाठी आम्हाला वेळ दिला, त्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव आम्हाला मार्गदर्शक ठरणारा आहे.

गाणे बघितल्यानंतर त्यांनी दिलेली कौतुकाची थाप ही कामाचे समाधान देणारी आणि भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरणादायी आहे. मेकअप पल्लवी तावरे यांनी केले आहे.

अधिक वाचा – 

पाहा व्हिडिओ – जेव्हा गायिका सुब्बालक्ष्मी संत तुकोबांचा अभंग गांधीजींच्या समोर गातात 

Back to top button