कोल्हापूर : चित्रपट महामंडळ कार्यालयाचे कुलूप 17 दिवसांनी काढले | पुढारी

कोल्हापूर : चित्रपट महामंडळ कार्यालयाचे कुलूप 17 दिवसांनी काढले

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कार्यकारिणीची बैठक घ्यावी, यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मुख्य कार्यालयाला लावलेले कुलूप 17 दिवसांनी काढण्यात आले. महामंडळाचे माजी अध्यक्ष विजय पाटकर, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

चित्रपट महामंडळाची कार्यकारिणीची बैठक न झाल्याने सर्वसाधारण सभेची तारीख निश्‍चित करता येत नाही. कोरोना काळात अनेक संस्थांच्या ऑनलाईन सभा झाल्या; पण चित्रपट महामंडळाची सभा होत नसल्याने उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी मुख्य कार्यालयाला कुलूप लावले. यामुळे कार्यालयीन कर्मचारी बाहेर बसून होते. शिवसेनेने याप्रकरणी हस्तक्षेप करत कुलूप काढावे, असे सांगितले होते.

त्यानुसार महामंडळाचे धनाजी यमकर, बाळा जाधव, मिलिंद अष्टेकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, सुजित चव्हाण, मंजित माने यांच्या उपस्थितीत कुलूप काढण्यात आले. कोल्हापूर हे कलाकारांचा सर्वांगीण विकास करणारे गाव आहे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ याची स्थापना मराठी सिनेकलाकार व नाट्य कलाकार यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी स्थापना झाली आहे. याला कुठेही खिळ बसू नये. यासाठी कुलूप काढण्यात आले. महामंडळाचे कामकाज सुरळीत चालणार असून सभासदांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यमकर यांनी केले.

Back to top button