Web Series: फॅमिली मॅन 3 सह ‘या’ सीरीज घालणार धुमाकूळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोना संसर्गाच्या तिसर्‍या लाटेने अनेक ठिकाणी थिएटर्स पुन्हा बंद करावी लागत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर मात्र नवनवीन वेबसीरीज रीलीज होणे सुरू आहे. यंदाचे वर्ष हे वेबसीरीजसाठी खास असेल. कारण गाजलेल्या वेबसीरीजचे सीक्वेल्स ( web series sequel ) या वर्षात पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे फॅमिली मॅन ३ सोबत ‘या’ वेब सीरीज यंदा धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज होत आहेत.

फॅमिली मॅन ३ ( web series sequel )

गतवर्षी ज्या सीरीजची चर्चा सर्वाधिक झाली ती म्हणजे ’फॅमिली मॅन २’. दाक्षिणात्य अभिनेत्री समंथामुळेही ही सीरीज चर्चेत राहिली. या सीरीजच्या तिसर्‍या सीझनची तयारीही यापूर्वीच सुरू झाली आहे. तिसरा सीझन ईशान्य भारतातील राज्यांतील घडामोडींवर आधारीत असणार आहे. लवकरच याचे शूटिंग सुरू होऊ शकते. वर्षाच्या अखेरीस हा सीझन अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर रीलीज होऊ शकतो.

स्कॅम २००३ ( web series sequel )

सोनी लिव्हवरील ‘स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी’ च्या जबरदस्त यशानंतर आता या सीरीजचा सीक्वेल ‘स्कॅम २००३’ दिग्दर्शक हंसल मेहता घेऊन येत आहेत. हे स्कॅम अब्दुल करीम तेलगी याच्या २० हजार कोटींच्या स्टॅम्प घोटाळ्यावर आधारीत आहे. या वर्षाच्या अखेरीस ही सोनी लिव्हवर स्ट्रीम होऊ शकते.

दिल्ली क्राईम ( web series sequel )

एमी इंटरनॅशनल पुरस्कार सोहळ्यात बेस्ट ड्रामा सीरीजचे अ‍ॅवॉर्ड मिळवून इतिहास घडवणार्‍या नेटफ्लिक्सवरील ‘दिल्ली क्राईम’ या सीरीजचा नवा सीझन या वर्षी येणार आहे. शेफाली शाह यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यावेळची कहाणी निठारी साखळी खून प्रकरणावर आधारीत असणार आहे. रीलीज डेट अद्याप समोर आलेली नसली तरी याच वर्षी ही सीरीज रीलीज होऊ शकते.

असुर २

अर्शर वारसीच्या ‘असुर’च्या सीक्वेलचे सध्या चित्रीकरण सुरू झाले आहे. बरुन सोबती, रिद्धि डोगरा, अनुप्रिया गोयंका आणि शारिब हाशमी यांच्यासह काही नवे चेहरेही यात दिसतील. जून-जुलैच्या आसपास ही सीरीज वूट सीलेक्टवर रीलीज होऊ शकते.

मेड इन हेवन

पहिल्या सीझनला लोकप्रियतेनंतर या सीरीजच्या दुसर्‍या सीझनचे काम यापूर्वीच सुरू झाले होते. मुख्य अभिनेता अर्जून माथूर याने दुसर्‍या सीझनचे शूटिंग संपल्याची माहितीही दिली होती. या वर्षाच्या अखेरीस दुसरा सीझन प्रदर्शित होऊ शकतो.

पंचायत २

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओवरील ‘पंचायत’च्या दुसर्‍या सीझनचे शूटिंग पूर्ण झाले आहे. याची रीलीज डेट घोषित व्हायची आहे. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव यात प्रमुख भूमिकेत आहेत.

 

Exit mobile version