Nora Fatehi : चॉकलेट-गोल्डन ड्रेसमध्ये नोराने वाढवला पारा - पुढारी

Nora Fatehi : चॉकलेट-गोल्डन ड्रेसमध्ये नोराने वाढवला पारा

पुढारी ऑनलाईन

आपल्या लुकने लाखो चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या नोरा फतेहीचा (Nora. Fatehi) नवा लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या या नव्या लूकमध्ये नोरा चॉकलेट आणि गोल्डन मिक्स शिमरी ड्रेस दिसतेय. तिचा (Nora. Fatehi) हा किलर लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

शिमरी ड्रेसने वेधलं लक्ष

लेटेस्ट फोटोंमध्ये नोराने कोट स्टाईल टॉप घातला आहे. त्यासोबत तिने ट्राउजर घातला आहे. आपल्या लुकला डिफरेंट बनवण्य़ासाठी तिने गळ्यात हेवी चोकर स्टाईल ज्वेलरी घातलीय. चॉकलेट आणि गोल्डन मिक्स शिमरी ड्रेसमध्ये नोराने मोकळ्या केसांसोबत लाईट मेकअप केलाय. तिच्या या फोटोशूटमध्ये नोराच्या मागे बॅकग्राउंड सिल्वर रंगाचं आहे. या फोटोंमध्ये ती कधी जमीनवर बसून किलर पोज देताना दिसते. तर कधी स्टूलवर बसून पोज देताना दिसते.

नोराला कोरोनाची लागण ३० डिसेंबर, २०२१ रोजी झाली होती. यानंतर तिने स्वत:ला आयसोलेट केलं होतं. आपण कोविड-१९ संक्रमित झाल्याची माहिती स्वत: तिने सोशल मीडियावर दिली होती. यानंतर तिचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. याविषयीची माहितीही नोराने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवरून दिली होती.

या व्हिडिओने घातला होता धुमाकूळ

नोराचा दोन दिवसांपूर्वी डान्स रिहर्सलचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ती शॉर्ट्समध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये नोरा एका डान्सरसोबत डान्स स्टेप्सची प्रॅक्टीस करतेय. ती प्रत्येक स्टेप्स परफेक्ट आहे. हा व्हिडिओ पाहण्यासारख आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं आहे.

एका दुकानामध्ये लॉटरीचं तिकिट विकणारी नोरा आज बॉलिवूडची डान्सिंग क्वीन झाली आहे. तिने एक वेट्रेस म्हणूनही काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत तिनं म्हटलं होतं. एक वेट्रेस बननं फार अवघड आहे. तुमच्याकडे व्यक्तीत्व असलं पाहिजे. तुम्ही शार्प असायला हवं. तुमची स्मरणशक्ती चांगली असायला हवी. परिस्थिती सांभाळण्याची क्षमता तुमच्याकडे हवी’.

नोरा फतेहीचं गुरू रंधावाचा म्युझिक व्हिडीओ ‘डान्स मेरी राणी’ लोकप्रिय ठरलं होतं. त्याचबरोबर, तिचं कुसू कुसू हे गाणंदेखील प्रचंड गाजलं आहे.

हेही वाचलं का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

Back to top button