Sonalee Kulkarni Makar Sankranti : काळ्या रंगाच्या साडीत नथीचा नखरा | पुढारी

Sonalee Kulkarni Makar Sankranti : काळ्या रंगाच्या साडीत नथीचा नखरा

पुढारी ऑनलाईन : ‘झिम्मा’ आणि ‘पांडू’ चित्रपटातून चाहत्यांच्या मनात घर करत असलेली आणि मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ म्हणजे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. सोनाली कुणाल बेनोडेकरसोबत ७ मे २०२१ रोजी लग्नबंधनात अडकली. यानंतर चित्रपटातील शूटिंगसोबतच ती आपल्या कुटूंबाला प्राधान्य देत आहे. सोनालीचे पती कुणाल दुबईत आणि सासूसासरे लंडनमध्ये असतात.   कुटूंबासोबत प्रत्येक सण साजरा करते. सध्या तिने आपल्या वेगळ्या शैलीने लग्नानंतरची पहिली मकर संक्रात ( Sonalee Kulkarni Makar Sankranti ) साजरी केली आहे.

सोनालीने नुकतेच पार पडलेल्या मकर संक्रांती सणाच्या चाहत्यांना भरभरून शुभेच्छा देत पैठणीतील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत सोनालीने पांढऱ्या रंगाच्या स्लीवलेस ब्लाउजसोबत गडद काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

या फोटोत सोनालीचा लूक ग्लॅमरस दिसत असून तिचे सौदर्य दिवसेंदिवस खुलत आहे. तिने साडीवर साजेशीर दागिन्यासोबत हटके पोज देखील दिली आहे. या फोटोतील खास म्हणजे, सोनालीने नाकात नथ घातली आहे. शेअर केलेल्या एका फोटोत सोनाली सोफ्यावर बसलेली दिसत आहे. हा तिचा राजेशाही लूकने चाहत्‍यांना भावला आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘संक्रांत स्पेशल with @sonalee_paithani 🪁 सूर्याचे तेज मकरसंक्रमणानंतर वाढत जाते तसेच आपले पण तेज (यश, किर्ती) वाढती असो., मकर संक्रांतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!, तिळगुळ घ्या गोडगोड बोला.’ असे लिहिले आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी सोनालीला मकर संक्रातीच्या ( Sonalee Kulkarni Makar Sankranti ) शुभेच्छा दिल्या आहेत. यात एका युजर्सने सोनालीला ‘सौंदर्याचा खजिना’ असे संबोधले आहे. तर दुसऱ्या एका युजर्सने ‘मीठे गुड मे मिल गए तिल उड़ी पतंग’, ‘एकदम महाराणी लूक झाला आहे ….👌👌👌👌’, ‘तीळ गुळ घ्या गोड गोड बोला’ असे लिहिले आहे. यासोबत काही चाहत्यांनी पंचग आणि हार्ट ईमोजी देखील शेअर केला आहे.

गेल्या २०२१ ख्रिसमसच्या निमित्ताने सोनाली तिच्या सासरी लंडनला गेली होती. यावेळी तिने ‘पांडू आणि ‘ झिम्मा’ चित्रपटाच्या आनंदासोबत येणाऱ्या नववर्षाचे जंगी स्वागत केले. यावेळचे काही फोटो आणि व्हिडिओ तिने आपल्या इंन्स्टाग्राम शेअर केले होते. या फोटोला चाहत्यांनी खूपसाऱ्या कॉमेंटस केल्या होत्या. सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांना अपडेट देत असते.

हेही वाचलंत का? 

Back to top button