sushmita sen : 'त्या' मुलासोबत व्हायरल झालेल्या व्हिडिओवर सुष्मिता म्हणाली... - पुढारी

sushmita sen : 'त्या' मुलासोबत व्हायरल झालेल्या व्हिडिओवर सुष्मिता म्हणाली...

पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन ( sushmita sen )  गेल्या काही दिवसांत बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत ब्रेकअपमुळे चर्चेत आली होती. आता ती आणखी एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुष्मिता आणि तिच्या दोन मुलींसोबत एक छोटा मुलगा दिसतो. पापाराझीसमोर ती या मुलाला घेऊन आल्याने तिने तिसऱ्या मुलाला दत्तक घेतले, असे वृत्त येऊ लागले. आता तिने तिच्या ट्विटर हॅँडलवर एक फोटो ट्विट केला असून या व्हिडिओनंतर तिने स्पष्टीकरण दिलं आहे.

सुष्मिता सेन ( sushmita sen )  काही दिवसांपुर्वीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाल्याचे जाहीर केले होत. यानंतर तिची सोशल मीडियावर चर्चांना उधान आलं होतं. याच दरम्यान आता तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओत सुष्मिता, दत्तक घेतलेल्या दोन मुली आणि एक छोटासा मुलगा दिसत आहेत.

या व्हिडिओत सुष्मिताने लाल आणि काळ्या रंगाच्या कपड्यात तर दोन्ही मुलींनी जीन्स आणि शर्ट परिधान केले आहे. याशिवाय छोट्या मुलाने पिवळ्या रंगाच्या टिशर्ट आणि निळ्या रंगाची पॅट घातल्याचे दिसून येते. याच दरम्यान फोटोला पोझ देताना सुष्मिताने त्या मुलाच्या हातात- हात घातला आहे. यावरूनच चाहत्याच्यात संभ्रम पसरला आहे.

वयाच्या पन्नाशीकडे वाटचाल करणाऱ्या सुष्मिताने २००० मध्ये रेनी आणि २०१० मध्ये अलिसा नावाच्या दोन मुलींना आधीच दत्तक घेतल्या आहेत. या दोन मुलींचे योग्य रित्या एकटीने पालकत्व स्विकारले आहे. परंतु, अचानक हा व्हिडिओ समोर आल्याने काही चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, सुष्मिताने आणखी एक मुलगा दत्तक घेतला आहे की काय? आणि हा मुलगा कोण आहे?. हा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.

याच दरम्यान सुष्मिताने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत पुन्हा ती छोट्यासा मुलासोबत मनसोक्त बोलताना दिसत आहे. यावेळी हा मुलगा एका कारवर बसलेला दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘my Godson’ असे म्हणत त्याच्या आईने फोटो काढला असल्याचे म्हटले आहे. यावरून सुष्मिताने नक्कीच मुलाला दत्तक घेतले आहे की नाही याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.

हेही वाचलंत का? 

(video: viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button