‘थला’ अजितने नेटफ्लिक्सची 300 कोटींची ऑफर नाकारली!

पुढारी ऑनलाईन

दाक्षिणात्य सुपरस्टार्सचा स्वतःचा असा वेगळाच ऑरा आहे. म्हणजे तिकडील बहुतांश हीरोंचे चित्रपट तुफान गर्दी खेचतात. मग, कोरोना संसर्गाची भीती असो किंवा 50 टक्के क्षमतेत थिएटर्स सुरू असोत. आवडत्या हीरोचा चित्रपट म्हणजे येथील प्रेक्षकांसाठी सोहळाच असतो. त्यामुळेच प्रेक्षकांसाठी इकडचे नायकदेखील उभे राहत असतात. आताही तमिळ सुपरस्टार अजित याचा आगामी चित्रपट ‘वलीमाई’ 14 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता; पण देशात पुन्हा कोरोना संसर्ग वाढू लागल्यानंतर अनेक निर्माते त्यांच्या चित्रपटांची रीलिज डेट पुढे ढकलत आहेत किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करत आहेत.

‘वलीमाई’ या चित्रपटाची रीलिज डेटही पोस्टपोन झाली आहे. प्रेक्षकांनी ‘थला’ असे बिरूद दिलेल्या अजितच्या या चित्रपटालाही नेटफ्लिक्सने तब्बल 300 कोटींची ऑफर दिली होती; पण अजितने ही ऑफर नाकारली असून हा चित्रपट थिएटर्समध्येच रीलिज करण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version