या चित्रपटात कॅटविक दिसणार प्रथमच एकत्र | पुढारी

या चित्रपटात कॅटविक दिसणार प्रथमच एकत्र

पुढारी ऑनलाईन

बॉलीवूडचे हॉट कपल कॅटरिना कैफ आणि विकी कौशल आता पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहे. अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर बनवत असलेल्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात ही जोडी एकत्र येणार आहे.

हा चित्रपट फरहानच्याच ‘दिल चाहता है’वरून प्रेरित असून यात मुलींची रोड ट्रीप असणार आहे. प्रियांका चोप्रा, कॅटरिना कैफ, आलिया भट्ट यात प्रमुख भूमिकेत आहेत. कॅटरिनाचा लव्ह इंटरेस्ट म्हणून या चित्रपटात विकी कौशल असेल.

निर्मात्यांना या भूमिकेसाठी विकीला गाठले आहे. विकीने हा चित्रपट नाकारण्याचे खरेतर सध्या काहीही कारण नाही. त्यामुळे सर्व काही सुरळीत झाले, तर कॅटविकचा हा पहिलाच एकत्रित चित्रपट ठरेल.

Back to top button