Hide & Seek : एक लंपडाव...तुम्हाला पण येईल तुमच्या बालपणाची आठवण... (व्हायरल व्हिडिओ) | पुढारी

Hide & Seek : एक लंपडाव...तुम्हाला पण येईल तुमच्या बालपणाची आठवण... (व्हायरल व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन डेस्क : एक…दोन… तीन… चार, पाच, सहा, सात किंवा दहा..आलो बघा…म्हणंत कधी  लंपडाव खेळलाय. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक चिमुरडी आपल्या कुत्र्याबरोबर लंपडाव खेळत आहे. पाहणारे देखील कुत्र्याचा खेळणं पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला नक्की तुमच्या बालपणीची आठवण येईल.

Hide & Seek : आलो रे आलो

सोशल मीडियामुळे कधी काही व्हायरल होईल हे सांगता येत नाही. दररोज काही ना काही व्हायरल होत असते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला नक्की तुमच्या बालपणीची आठवण येईल  यामध्ये एक छोटी मुलगी व एक कुत्रा खेळत आहेत. त्यामध्ये हे दोघे लंपडाव खेळत आहेत. ती छोटी मुलगी तिच्या कुत्र्याला सूचना देत आहे. ती ज्या काही सूचना देईल तसे कुत्रेही कृती करत. ते पुन्हा पाठीमागे वळुन पाहते तेव्हा ती पुन्हा त्याला सूचना देते. ती लपते तेव्हा ते कुत्रं तिला  शोधायला जाते. या  मजेशीर व्हिडिओला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे.

 

हेही वाचलंत का?

Back to top button