नागपंचमी: भारतीय स्त्रिया नागाला का मानतात भाऊ आणि का करतात भावासाठी उपवास? | पुढारी

नागपंचमी: भारतीय स्त्रिया नागाला का मानतात भाऊ आणि का करतात भावासाठी उपवास?

पुढारी ऑनलाइन डेस्क : आज नागपंचमी. श्रावण महिन्यातील हा पहिला सण. या सणाला धार्मिक, पौराणिक, शास्त्रीय असे महत्व आहे. विशेष करून नागपंचमी हा उत्सव महिला मोठ्या प्रमाणात साजरा करतात. आज वारुळात जाऊन गाणी म्हणतात, फेर धरतात. तसेच नागपंचमीच्या आदल्या दिवशी किंवा नागपंचमीच्या दिवशी भारतातील स्त्रिया नागाला भाऊ मानून त्यांच्यासाठी उपवास करतात. चला तर जाणून घेऊया यामागील पौराणिक कथा…

तसे तर याबाबत वेगवेगळ्या कथा याबाबत प्रचलित आहेत; पण सत्येश्वरीची कथा सगळ्यात जास्त प्रचलित आहे. सत्येश्वरी एक देवी होती. तिला सत्येश्वर हा भाऊ होता. मात्र, सत्येश्वर अचानक नागपंचमीच्या आदल्या दिवशी मरण पावला. त्याच्या शोकात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. तर नंतर सत्येश्वरीला आपला भाऊ हा नागरुपात दिसला.

तिने त्याला आपला भाऊ मानले. त्या नागदेवतेने तिला वचन दिले. जी बहीण मला भाऊ मानून पूजा करेल तिचे मी रक्षण करेन. त्यानंतर त्या नागदेवतेने सत्येश्वरीला नवीन वस्त्रे अलंकार दिले. तसेच दोघांनीही जंगलात झोका खेळला यामुळे सत्येश्वरीचे दुःख कमी झाले. तसेच आपला भाऊ पुन्हा मिळाल्याचा आनंदही झाला. त्यामुळे या दिवशी स्त्रिया नागाला आपला भाऊ मानून त्याच्या मांगल्यासाठी उपवास करतात, अशी ही पाैराणिक कथा आहे.

हेही वाचा:

Back to top button