कोल्हापूरात जखमी माकडाला जीवदान | पुढारी | पुढारी

कोल्हापूरात जखमी माकडाला जीवदान | पुढारी

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

मोठ्या नर माकडाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आणि त्यानंतर उपचारासाठी जाताना कुत्र्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावलेल्या माकडाला प्राणीमित्र धनंजय नामजोशी यांनी जीवदान दिले आहे. आज रविवार (दि.२८) रोजी सकाळी शिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम परिसरात माकडाच्या कळपातील मोठ्या नराने हल्ला करून जखमी केलेल्या दुसऱ्या नर माकडाला पाहून भागातील नागरिकांनी प्राणीमित्र धनंजय नामजोशी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी त्या ठिकाणी लगेचच पोहोचून जखमी माकडाला सुरक्षितपणे पकडून उपचारासाठी नेले.

अधिक वाचा : चंदगड : फाटकवाडी धरण ओव्हरफ्लो

दरम्यान अग्निशामक दलाची गाडीही तिथे आल्याने, त्या गाडीतून माकडाला उपचारासाठी नेत असताना माकड पोतं फाडून बाहेर आले आणि गाडीच्या टपावर आणि तिथून रस्त्याच्या कडेला जाऊन बसले. जखमी असल्यामुळे उडी मारून वर जाऊ शकले नाही, त्या माकडाजवळ येणाऱ्या कुत्र्याला पाहून धनंजय नामजोशी यांनी कुत्र्याला हाकलून पुन्हा माकडाला पकडून पुढे पांजरपोळ मधील डॉक्टर राजकुमार बागल यांच्याकडे नेले. 

अधिक वाचा : कोयनेतून २१११ क्युसेक पाण्याचा विसर्ग

माकडाच्या हातावर, डाव्या पायावर आणि पाठीवर जखम झाली असून, उपचारानंतर त्याला पुन्हा कळपात सोडून देण्यात येणार आहे. यावेळी प्राणीमित्र धनंजय नामजोशी यांच्यासोबत टिंबर मार्केट अग्निशामक दलाचे आकाश माने, गिरीश गवळी व सनी पटेल हे सुध्दा होते.

Back to top button