जावळीत सर्पदंश झालेल्‍या युवकाची मृत्‍यूशी झुंज  | पुढारी

जावळीत सर्पदंश झालेल्‍या युवकाची मृत्‍यूशी झुंज 

कुडाळ : प्रतिनिधी 

जावळी तालुक्यातील वाटँबे येथील दुर्गम भागातील एका 17 वर्षीय युवकाला काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सर्पदंश झाला. यानंतर त्‍या युवकाला उपचारासाठी स्थानिक पातळीवरील केरघळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या ठिकाणी अत्यावश्यक सेवा न मिळाल्याने सतरा वर्षे युवकाचा जीव टांगणीला लागला. 

पुढील उपचारासाठी त्‍याला सातारा येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत सापाचे विष युवकाच्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात पसरल्‍याचे निष्‍पन्न झाले. त्‍यामुळे त्‍याला पुणे येथे दाखल करण्याची वेळ युवकाच्या नातेवाईकांवर आली आहे.

साताऱ्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या दहा हजारावर पोहोचली आहे. जिल्‍ह्यात रूग्‍णसंख्या वाढल्‍याने व्हेंटिलेटर असणारी रूग्‍णवाहिका उपलब्‍ध होत नसल्‍याने युवकावर मृत्‍यूशी झुज देण्याची वेळ आली आहे. 

या प्रकाराने संतापलेल्‍या नातेवाईकांनी जावळी तालुक्‍यातील आरोग्य विभागावर संताप व्यक्‍त केला. तालुक्‍यामध्ये व्हेंटिलेटर असणारी रूग्‍णवाहिका उपलब्‍ध होत नसल्‍याने अनेक अत्‍यवस्‍थ रूग्‍णांना जीव गमावण्याची वेळ आली आहे. याला आरोग्‍य विभाग जबाबदार असल्‍याचा आरोप स्‍थानिक नागरिकांमधून करण्यात येत आहे. 

Back to top button