कोझिकोड विमान दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना धनंजय दातार यांच्याकडून आर्थिक मदत | पुढारी

कोझिकोड विमान दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना धनंजय दातार यांच्याकडून आर्थिक मदत

वाशिम : पुढारी वृत्तसेवा

एअर इंडियाचे दुबईहून आलेले विमान केरळमधील कोझिकोड विमानतळावर घसरुन मोठा अपघात झाला होता. या दुर्घटनेत वैमानिक कॅप्टन दीपक वसंत साठे यांच्यासह सह-वैमानिक व प्रवाशांसह १८ जण मृत्यूमुखी पडले होते. या मृतांच्या वारसांना वैयक्तिक साह्य म्हणून अल अदील ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसाला किंग डॉ. धनंजय दातार २० लाख रुपयांचा निधी देणार आहेत. 

दातार हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील

यासंदर्भात बोलताना डॉ. दातार म्हणाले, दुर्घटनाग्रस्त विमानात अनेक प्रवासी असे होते ज्यांनी परदेशातील त्यांचे रोजगार गमावले होते. अनेकजण व्हिजिट व्हिसाची मुदत संपल्यामुळे मायदेशी परत येत होते. अशा स्थितीत मृत प्रवाशांवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांवरील किमान आर्थिक दडपण काहीसे हलके व्हावे म्हणून मी वैयक्तिकरीत्या हा पुढाकार घेतला आहे. मी एअर इंडियाच्या आपत्ती व्यवस्थापन संघाशी थेट समन्वय साधून ही मदत अखंड स्वरुपात योग्य व गरजू लोकांच्या हाती पडेल यासाठी प्रयत्न करत आहे. मला भारतीय कॉन्सुलेटचा या मोहिमेसाठी पाठिंबा मिळत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

Back to top button