औरंगाबाद : घाटशेंद्रा येथील ग्रामस्थांनी रात्र काढली जागून (video) | पुढारी

औरंगाबाद : घाटशेंद्रा येथील ग्रामस्थांनी रात्र काढली जागून (video)

कन्नड (औरंगाबाद) : पुढारी वृत्तसेवा 

कन्नड तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील घाटशेंद्रा, चिंचोली, करजंखेडा या भागास पावसाने अक्षरशः झोडपून काढले. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नागरीकांची एकच तारांबळ उडाली. घाटशेंद्रा येथे रात्री जोरदार पाऊस झाल्याने डोंगरातील पाण्याचा ओघ गावात आला. तसेच नदी नाल्याना मोठा पूर आला. यामुळे डोंगर परिसरातील काही गावात घरांसमोर दोन फुटांवर पाणी साचले. यामुळे काहींच्या घरात पाणी गेल्याने नागरीकांना रात्र जागून काढावी लागली.

पावसाचे पाणी गावात शिरल्याने गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अचानक पाणी आल्याने गावकऱ्यांना पाणी बाहेर कसे काढावे असा प्रश्न पडला होता. तालुक्यात प्रथमच एवढी मोठी नैसगिक आपत्ती आली असून त्यात कोरोना सारख्या महामारीत शेतकरी अडचणीत सापडला आहे. या कन्नड तालुक्यातील बहुतांश नागरीक शेतीवर अवलंबून आहेत. यामुळे गावकऱ्यांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

Back to top button