सातारा : विविध मागण्यांसाठी वाघ्‍या-मुरळींचे आंदोलन (video) | पुढारी

सातारा : विविध मागण्यांसाठी वाघ्‍या-मुरळींचे आंदोलन (video)

सातारा : पुढारी वृत्तसेवा

वाघ्या-मुरळी कलाकारांना उदरनिर्वाहासाठी विशेष निधी किंवा अनुदान द्यावे. या कलावंतांच्या मुलामुलींच्या शिक्षणाचा खर्च शासनाने करावा. शासन दरबारी नोंदणी करुन या लोककलेला मान्यता द्यावी. शासनाने कलावंतांना जमीन देवून घरकूल योजना मंजूर करावी. वाघ्या-मुरळींना कायमस्वरुपी पेन्शन सुरु करावी आदी मागण्यांसाठी वाघ्या-मुरळींनी भंडारा उधळत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘जागरण-गोंधळ’ घालून अनोखे आंदोलन केले.

अधिक वाचा : मराठा समाजाच्या असंतोषामुळे मुंबईत जमावबंदी, चंद्रकांत पाटील यांचा आरोप 

यावेळी वाध्या मुरळींनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना  निवेदन दिले. यामध्ये त्‍यांनी वाघ्या-मुरळी कलावंत कलेच्या माध्यमातून धर्मजागरण, कुलधर्म, कुळाचार पालन, समाज प्रबोधनाद्वारे समाजसेवेचे काम करत आहेत. भाविकांच्या आश्रयावर आमच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह होत असतो. सध्या कलावंतांना जगण्यापुरतेही उत्पन्न मिळत नाही. लॉकडाऊन काळात जागरण-गोंधळ कार्यक्रम होत नसल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. कुटुंबियांवर उपसमारीची वेळ आली आहे.  

अधिक वाचा : कृषी विधेयकात काय आहे? ज्यामुळे पंजाबमध्ये शेतकऱ्यांपुढे झुकावे लागले अकाली दलास!

राज्यातील कलावंतांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. नियमांचे पालन करुन कलावंतांना कुळाचाराचे पालन करण्यास परवानगी द्यावी. देवालये, मंदिरे खुली करावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे. यावेळी अविनाश पवार, प्रमोद शिंदे, बाळासाहेब मोहिते, पुरुषोत्तम घोरपडे, दत्ता शिंदे, प्रदीप पवार, सोमनाथ शिंदे, शिवाजी पवार उपस्थित होते.

Back to top button