'कंगना तुला फेमिनिजमधील 'एफ' तरी कळतो का? कुणी काही म्हटलं की सगळा भाजप सोबत घेऊन येतीस' | पुढारी

'कंगना तुला फेमिनिजमधील 'एफ' तरी कळतो का? कुणी काही म्हटलं की सगळा भाजप सोबत घेऊन येतीस'

मुंबई : पुढारी ऑनलाईन

गेल्या काही दिवसांपासून जाणीवपूर्वक बेलगाम वादग्रस्त वक्तव्ये करत सुटलेल्या ड्रामेबाज कंगना राणावतवर बॉलिवूडमधून सडकून टीका होत आहे. तिच्या समर्थनार्थही काही चेहरे पुढे आले आहेत. अलीकडेच कंगनाने जया बच्चन आणि उर्मिला मातोंडकर यांनाही लक्ष्य केले. आता बिग बॉसची माजी स्पर्धक अर्शी खानने कंगना रानावतला चांगलाच टोला लगावला आहे. तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती कंगनाने केलेल्या विधानांचा समाचार घेताना दिसत आहे. त्यामुळे अर्शी खानचा हा व्हिडिओ चर्चेत आहे.

व्हिडिओमध्ये अर्शी खान कंगनाबद्दल म्हणते की, कंगना तू महिलांचा आदर करण्याबद्दल बोलतेस. फेमिनिजमबद्दलही बोलतेस, पण तुला त्यातील एफ तरी कळतो का? तू नेहमी स्वत:च्या सन्मानाची चर्चा करतेस, पण जेव्हा दुसर्‍या स्त्रीबद्दल किंवा इतर कोणत्याही कलाकाराबद्दल बोलतेस तेव्हा बी वर्ग अभिनेत्री, सी श्रेणी, सॉफ्ट पॉर्न बोलतेस,जर कोणी तुला काही बोलले तर संपूर्ण भाजप घेऊन येतेस. तुला वाय श्रेणीची सुरक्षा मिळते. जे तुझे मूर्ख समर्थक आहेत तसले आजपर्यंत मी कधीही पाहिले नाहीत. 

व्हिडिओमध्ये अर्शी खान पुढे म्हणते की, तू आपल्या समर्थकांना धमकावण्यापेक्षा एखाद्याचा आदर करणे चांगले आहे असं म्हटलं होतीस. लोकांनी ज्या पद्धतीने तुझ समर्थन केलं पाहिजे असं तुला वाटतं ते या देशात होत नाही. या देशात प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. जर तुला असे सांगितले की तुला ड्रग्स दिली गेलं आहे तर तु आजपर्यंत त्याचं नाव का सांगितलं नाहीस? तू आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले तर ते सिद्ध कर. कंगना, आता तू गप्प बस. आता हे सर्व करु नकोस. सर्वांना हे प्रकरण समजले आहे. हा तुझा राजकीय अजेंडा आहे.

 

Back to top button