बेळगाव-महाराष्ट्र बससेवा सुरू, अल्प प्रतिसाद | पुढारी

बेळगाव-महाराष्ट्र बससेवा सुरू, अल्प प्रतिसाद

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

कोरोनामुळे लॉकडाऊन काळात बंद करण्यात आलेली आंतरराज्य बससेवा मंगळवारपासून सुरू झाली आहे. मंगळवारी कर्नाटकातून महाराष्ट्रात बस धावल्या. मात्र प्रवाशाकडून केवळ 30 टक्के प्रतिसाद मिळाला. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ऑनलाईन वेळापत्रकाची सोय परिवहन खात्याने केली आहे.

कर्नाटक – महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा सुरू करण्यासाठी दोन्ही राज्यांतील परिवहन महामंडळांमध्ये एकमत झाले.  महाराष्ट्रातील प्रत्येक मार्गावर एक याप्रमाणे बस सोडली जाणार आहे. 

प्रवाशांना ऑनलाईन वेळापत्रक पाहूनच बस प्रवास करावा लागेल. परिवहन मंडळाच्या हीींिीं ://पुज्ञीींल.ज्ञरीरपरींरज्ञर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर  वेळापत्रक उपलब्ध करण्यात आले आहे. बसचे नवे वेळापत्रक आणि बसच्या फेर्‍यांची माहिती सध्या ऑनलाईनद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहूनच बसची संख्या वाढविण्याचा निर्णय कर्नाटकच्या वायव्य परिवहन मंडळाने घेतला आहे. 

कोरोना संसर्गामुळे अद्याप परिवहनच्या गोवा आंतरराज्य सेवेलाही म्हणावा तसा प्रतिसाद लाभलेला नाही. सध्या परिवहन मंडळ आर्थिक तोट्यात असल्याने वेळापत्रकानुसार बसेस सोडण्यास महामंडळ तयार नाही. 

Back to top button