बंगळूर : राज्यभरात शेतकर्‍यांचा रास्ता रोको | पुढारी

बंगळूर : राज्यभरात शेतकर्‍यांचा रास्ता रोको

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

भू सुधारणा कायदा, एपीएमसी कायद्यासह काही कायद्यांना शेतकर्‍यांचा विरोध असून केंद्र आणि राज्य शासनाविरुद्ध शेतकरी तसेच विविध संघटनांनी सोमवारी (दि. 28) राज्यव्यापी बंद पुकारला आहे. तर याविरुद्ध शेतकरी संघटनांनी दिलेल्या भारत बंद हाकेमुळे कर्नाटकात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला.

बेळगावसह हुबळी-धारवाड, बंगळूर, म्हैसूर, चामराजनगर, मंड्या आदी जिल्ह्यांतील राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग रोखून निदर्शने करण्यात आली. सुमारे 35 संघटनांनी रास्ता रोको करून ‘जेल भरो’ आंदोलन केले. यामुळे काही तास रहदारी खोळंबली. आंदोलनामुळे राज्यातील सर्वच महामार्गांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त  ठेवण्यात आला होता.

भू सुधारणासह तीन विधेयके मागे घेण्याची मागणी सरकारकडे केली होती; पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारचा बंद निश्चित आहे.

– कोडीहळ्ळी चंद्रशेखर शेतकरी नेते

Back to top button