जालना : राजूरकर कोठात शॉर्टसर्किटच्या आगीत ऊस जळाला | पुढारी

जालना : राजूरकर कोठात शॉर्टसर्किटच्या आगीत ऊस जळाला

कुंभार पिंपळगाव (जालना) : पुढारी वृत्‍तसेवा

घनसावंगी तालुक्यातील राजूरकर कोठा येथील शेतकरी रवी प्रकाश खाडे यांच्या शेतातील चारी नंबर 32 शेजारील  गट नंबर  171 मधील अंदाजे १ ते दीड एकरवरील ऊस आज (रविवारी) शॉर्टसर्किट झाल्‍याने जळाला. यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. 

या विषयी अधिक माहिती अशी की, घनसावंगी तालुक्‍यातील राजूरकर कोठा येथील रवी प्रकाश खाडे यांच्या शेतातील ऊसाला विजेच्या तारांचे घर्षण होऊन  स्‍पार्किंग झाल्याने आग लागली. ऊसाला आग लागली तेव्हा खाडे हे बाहेरगावी होते. या आगीची माहिती मिळेपर्यंत ऊस जास्त प्रमाणात जळाला. बाजूच्या शेतकऱ्यांनी ऊस विझवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळानंतर आग आटोक्यात आली. 

घनसावंगी तालुक्यात विजेच्या शॉर्टसर्किटने ऊस जळाल्‍याच्या अनेक घटना घडल्‍या आहेत.शॉटसर्किटने झालेली ऊसाची  नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Back to top button