नाशिक जिल्ह्यातील जवान अरुणाचलमध्ये शहीद | पुढारी

नाशिक जिल्ह्यातील जवान अरुणाचलमध्ये शहीद

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

मालेगाव तालुक्यातील माणके गावचे रहिवासी जवान मनोराज शिवाजी सोनवणे हे सीमेवर तैनात असताना शहीद झाले आहेत. याबाबतची माहिती मालेगाव तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे. सोनवणे हे २१ पॅराट्रूप स्पेशलमध्ये काम कार्यरत होते.

तहसील कार्यालयातर्फे प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, सोनवणे हे सैन्यातील २१ पॅराट्रूप स्पेशल फोर्समध्ये कार्यरत होते. दहा दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशमधील देशाच्या सीमेवर तैनात असताना त्यांना बदलत्या वातावरण आणि अती उंच प्रदेशाचा त्रास जाणवला. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे दहा दिवसांपूर्वी त्यांना कोलकातामधील कमांड हॉस्पिटल येथे हलविण्यात आले होते. याठिकाणी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Back to top button