सिडकोत विजेच्या धक्‍क्याने युवकाचा मृत्यू | पुढारी

सिडकोत विजेच्या धक्‍क्याने युवकाचा मृत्यू

सिडको : पुढारी वृत्तसेवा

ड्रेनेजचे काम करताना भूमीगत वायर तुटल्याने त्याचा शॉक लागून शिवशक्‍ती चौकात युवकाचा दुर्देवाने मृत्यू झाला. या घटनेत त्याचा भाऊ जखमी झाला. त्याला उपचारासाठी रूग्‍णालयात दाखल केले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे. 

सिडकोतील शिवशक्‍ती चौकातील नानाजी जगताप कुटूंबा समवेत राहतात. या भागात ड्रेनेजचे काम सुरू होते. यात जेसीबी च्या धक्याने भूमीगत वायर तुटली होती. आज (गुरुवार) सकाळी धीरज जगताप (वय २५) हा पाणी  मारत असताना विदयुत तारेचा शॉक लागून त्‍याचा मृत्यू झाला. त्याचा भाऊ अमोल जगताप (वय २८) त्याला वाचवायला गेला असता, त्यालाही शॉक लागून तो जखमी झाला. त्याला उपचारार्थ रूग्‍णालयात दाखल केले आहे. 

घटनास्थळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरीसह पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. मृत धीरज हा मुंबई येथे खासगी कार्यालयात नोकरीला होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.  

Back to top button