नाशिक : अंबड एमआयडीसीतील आगीत खेळण्यांची कंपनी जळून खाक  | पुढारी

नाशिक : अंबड एमआयडीसीतील आगीत खेळण्यांची कंपनी जळून खाक 

सिडको (नाशिक)  :  पुढारी वृत्तसेवा

अंबड एमआयडीसी मधील एका खेळणी बनवण्याच्या कंपनीला आज (रविवार) पहाटे अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. वेळीच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.(Fire at Ambad MIDC in toy company in Nashik)

अधिक वाचा : नवरा म्हणाला, प्रियकरानेच बायकोला संपवले, पण प्रत्यक्षात मारेकरी तिसराच निघाला!

या विषयी अधिक माहिती अशी की, रविवारी पहाटे ६ वा.१५ मिनिटांनी अंबड एमआयडीसी येथील फ्रेश अप बेकरीच्या जवळील प्लॉट क्रमांक ४५ वरील नलिनी कुलकर्णी यांच्या मालकीचे अमोल इंडस्ट्रीज ही खेळण्यांची कंपनी आहे. या कंपनीला अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच सिडको व अंबड एमआयडीसी येथील अग्निशमन दल केंद्राचे एकूण तीन बंब ६ वाजून ४७ मिनिटांनी त्या ठिकाणी पोहोचले. यावेळी शर्थीचे प्रयत्‍न करून आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अधिक वाचा : खंडणीच्या गुन्ह्यात किरीट सोमय्यांचे पुत्र आणि नगरसेवक नील यांची कसून चौकशी!

या आगीमध्ये मोल्डिंग मशिनरी, सीसीटीव्ही कॅमेरे, इलक्ट्रिकल वायर, रॉ मटेरियल जळून खाक झाले. आग विझवण्याकरता सिडको अग्निशमन दलाचे प्रभारी चीफ फायर अनिल जाधव, केंद्रप्रमुख देविदास चंद्रमोरे, वाहनचालक सुनील घुगे, इस्माईल काजी, अविनाश सोनवणे, कांतीलाल पवार, संजय गाडेकर व सोमनाथ शिंदे यांनी मदत केली.

Back to top button