LGBTQIA: गे, लेस्बियन, ट्रान्सजेंडर म्हणजे काय? | पुढारी

LGBTQIA: गे, लेस्बियन, ट्रान्सजेंडर म्हणजे काय?

कोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन डेस्‍क 

जून महिना जगभरात प्राईड मन्थ म्हणून साजरा केला जातो. समलिंगी व्यक्तींच्या हक्कांबद्दल जगजागृती करणारा हा महिना आहेच, शिवाय जग हे एकरंगी नसून ते इंद्रधनुष्यासारखं विविध रंगाचं आहे, हा संदेश हा महिना देत असतो. समलिंगी व्यक्तींच्याबद्दल जगाला अधिक संवेदनशील बनवण्याचा प्रयत्न हा महिना करत असतो. 

अधिक वाचा : ‘…त्यामुळे फडणवीस खडसेंच्या घरी गेले असतील’

पण समलिंगी व्यक्ती किंवा समलैंगिक व्यक्ती म्हणजे नेमकं काय? LGBTQIA ही जी टर्म वापरली जाते, त्याचा नेमका अर्थ काय? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. फार काही कठीण नाही, हे समजून घेणं. L for Lesbian – लेस्बियन या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे. लेस्बियन म्हणजे अशी महिला जी लैंगिकदृष्ट्या किंवा भावनिकदृष्ट्या दुसर्‍या महिलेकडे आकर्षित होते.

अधिक वाचा : मुंबईत पेट्रोलचे दर न्यू यॉर्कपेक्षा दुप्पट!

G for Gay – हा शब्द जास्त प्रचलीत आहे. सुरुवातीला समलैंगिक लोकांच्या हक्कांबद्दल ज्या चळवळी सुरू होत्या, त्यातही Gay हा शब्द जास्त प्रचलित होता. Gay म्हणजे असा पुरुष जो लैंगिक आणि भावनिक दृष्ट्या इतर पुरुषाकडे आकर्षित होतो.

B for Bisexual – लैंगिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्याही वेगवेगळ्या लिंगी व्यक्तींकडे आकर्षित होणार्‍या व्यक्तीला बायसेक्शुअल म्हटलं जातं. 

T for Transgender – ही संज्ञा समजून घेणं थोडं किचकट आहे. जन्मावेळी निर्सगाने जे लिंग दिलं आहे, त्याच्या विरुद्ध लैंगिक वर्तणूक असलेली व्यक्ती म्हणजे ट्रान्सजेंडर होय.

Q for Queer – ही सर्वसमावेशक अशी संज्ञा आहे. जी व्यक्ती स्ट्रेट किंवा भिन्न लैंगिक नाही, अशा सर्वांचा यात समावेश होतो. 

I for Intersex – पुरुष किंवा स्त्री म्हणून ओळख पटवता येतील असे नैसर्गिक जीवशास्त्रीय लक्षणं नसलेली व्यक्ती म्हणजे Intersex होय. अशा व्यक्तीत गुणसूत्रांत काही बदल असू शकतो, किंवा त्यांचे लैंगिक अवयव वेगळे असू शकतात, किंवा वयात येताना नैसर्गिक लिंगापेक्षा दुसर्‍या लिंगाचे हार्मोन शरीरात रिलीज होतात. मानवातील एक नैसर्गिक व्हेरिएशन म्हणून याकडे पाहिलं जातं. 

A for Asexual – ज्या व्यक्तीमध्ये लैंगिक भावनाच नसतात अशांना Asexual म्हटलं जातं. 

Back to top button