गोवा: मद्यविक्रीतून राज्याला ५०९.११ कोटींचा फायदा | पुढारी

गोवा: मद्यविक्रीतून राज्याला ५०९.११ कोटींचा फायदा

पणजी ; विठ्ठल सुकडकर : मद्यपान हे आरोग्यासाठी हानीकारक असल्याचे म्हटले जात असले तरी गोव्यात मद्यपान करणार्‍यांची संख्या मोठी आहे. मद्य व्यवसायातून राज्याला मिळणारा महसूलही मोठा आहे. पर्यटन हंगामात तर मद्याच्या मागणीत मोठी वाढ होते. २०२० ते २०२१ या आर्थिक वर्षात  मद्य विक्रीच्या व्यवसायातून अबकारी खात्याला यावर्षी ५०९.११ कोटी रुपये महसुली उत्पन्न मिळाले आहे.

अधिक वाचा : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे १५ लाख कोटी रुपयांचे नुकसान

कोरोनामुळे या महसूलाला किंचित फटका बसला आहे. जानेवारी ते मार्च २०२१ पर्यंतच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. वार्षिक लक्ष्यपूर्तीसाठी ३८.८४ कोटी रुपये उत्पन्नात फटका बसला आहे. तरी अबकारी खात्याने मार्चमध्ये १०९.२४ कोटी दुप्पट उत्पन्न प्राप्ती केल्याची माहिती अबकारी आयुक्त शशांक मणी त्रिपाठी यांनी दिली.

अधिक वाचा : दहावीचा निकाल १३ जुलै रोजी

सरकारने अबकारी खात्याला २०२०-२१ वर्षासाठी ५४७.९४ कोटी रुपये उत्पन्न प्राप्तीचे लक्ष्य दिले होते. तरी खात्याने मार्च २०२१ मध्ये मद्य विक्रीत दुप्पट उत्पन्न प्राप्ती केली आहे. मार्च महिन्याचे ६७ कोटी रुपये लक्ष्य होते. खात्याने १०९.२४ कोटी रुपये उत्पन्न प्राप्ती करून वार्षिक उत्पन्नाचे लक्ष्य गाठले आहे.

सरकारने अबकारी खात्याला महसूल उत्पन्न प्राप्तीसाठी २०१८-१९ मध्ये ४०५ कोटींचे लक्ष्य दिले होते. त्यावेळी खात्याने ४४७.२५ कोटी रुपये उत्पन्न प्राप्ती केली. २०१९-२० मध्ये ४७५.२८ कोटी रुपये लक्ष्य दिले होते. त्यावेळी खात्याने ४८७.६९ कोटी रुपये उत्पन्न प्राप्ती केली होती. 

अधिक वाचा : रुग्ण बरे होण्याचा दर ९०.७१ टक्के 

यावर्षी २०२०-२१ मध्ये ५४७.९५ कोटी रुपये लक्ष्य दिले होते. तर ५०९.११ कोटी रुपये उत्पन्न प्राप्ती केली. एप्रिल ते ऑक्टोबर २०२० पर्यंतच्या आठ महिन्यांत मद्य विक्रीत खात्याचे उत्पन्न बरेच घटलेले आहे. नोव्हेंबर ते मार्च २०२१ पर्यंत जास्त प्रमाणात मद्य विक्री झालेली असून उत्पन्नातही भर पडलेली आहे. डिसेंबर ७०.९२, जानेवारी ५६.८५, फेब्रुवारी ६०.८८ व मार्च १०९.२४ या चार महिन्यांत २९७.७६ कोटी रुपये खात्याला उत्पन्न प्राप्ती झाली असल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले.

राज्यात सप्टेंबरच्या मध्यापासून पर्यटनाच्या मोसमाला सुरूवात होते. दरवर्षी पर्यटनाचा मोसम सुरू झाल्यानंतर जास्त प्रमाणात मद्याचा खप वाढून अबकारी खात्याला मोठी उत्पन्न प्राप्ती होते. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे संचारबंदी सुरू असल्यामुळे मद्य विक्रीत मोठी घट झाली असून खात्याचे उत्पन्नही घटलेले आहे.

सरकारने अबकारी वगळता महामारीच्या संकटात इतर सर्व खात्यांना उत्पन्न प्राप्तीत लक्ष्य कमी केले होते. मात्र अबकारी खात्याच्या उत्पन्नात २५ टक्के वाढ करून ५४७.९५ कोटींचे लक्ष्य दिले होते. तरी खात्याने मद्य विक्रीत बरी प्रगती केल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले.

Back to top button