भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मैदानाबाहेरील वैर आणि कटुतेने गाजलेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सईद अजमलचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
भारत - पाकिस्तानमध्ये आशिया चषक 20-ट्वेंटी स्पर्धेत गट टप्प्यात आणि सुपर फोरमध्ये मिळून दोन सामने खेळवले. दोन्ही वेळेस भारतीय संघाने पाकिस्तानवर सहज विजय मिळवला.
पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी करत एशिया कप 2025 वर आपले वर्चस्व कायम ठेवले. भारताच्या या विजयाचे सर्वात मोठे हिरो माहित आहेत का?