

उत्सवाचा काळ वातावरणातील मरगळ, नकारात्मकता दूर करतो. नागरिकांना ऊर्जा मिळत राहते. दुसरीकडे रोजगाराला चालना मिळतेच, शिवाय आर्थिक उलाढालही वाढते. या आधारे देशाची अर्थव्यवस्था सक्षम होण्यास मदत मिळते.
सागर शहा, सीए
देशात सणासुदीला, उत्सवांत लाखो, कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. यावर्षी ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर तब्बल सहा लाख कोटी रुपयांचे व्यवहार होण्याची शक्यता असून त्यात ऑनलाईनवर 1.20 लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. ही उलाढाल देशाच्या जीडीपीच्या 3.2 टक्के आहे. नामांकित ई-कॉमर्स कंपन्यांनी तर उत्सवाच्या काळात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी कपातीचा लाभ उचलण्यासही सुरुवात केली आणि ती ग््रााहकांपर्यंत पोहोचविली जात आहे.
डेटम इंटिलिजन्सच्या अहवालानुसार, 2025 मध्ये जीएसटी दर सर्वसामान्यांना अनुकूल केल्याने यावर्षी दिवाळीला विक्रीचे प्रमाण 27 टक्क्यांनी वाढत ते 1.20 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कर कपात केल्याने अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीत बऱ्यापैकी घट झाली आहे आणि त्यामुळे विक्रीत पंधरा ते वीस टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. नवीन जीएसटी व्यवस्थेत आता 5 आणि 18 टक्के अशा दोनच कर श्रेणी ठेवल्या आहेत. टीव्ही, एसी, इलेक्ट्रॉनिक्स उपकरण, कंझ्युमर ड्युरेबल खरेदीत अधिक बचत होऊ शकते. संशोधन संस्थेच्या अहवालानुसार, गेल्या तीन वर्षांत प्रथमच शहरातील ग््रााहकांच्या खर्चात वाढ दिसून आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 37.6 टक्के ग््रााहकांनी अनावश्यक वस्तू खरेदीपोटी खर्चात वाढ केल्याचे निदर्शनास आले आहे.
ग््राामीण किंवा तालुकास्तरावरील ग््रााहकांनी खर्चात 54.7 टक्क्यांनी वाढ केली असून ती मागील दोन वर्षांतील सर्वाधिक आहे. या आकडेवारीवरून आणखी एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे लोकांच्या उत्पन्नात झालेली वाढ. या कारणामुळे नागरिक बचतही करत आहेत आणि खर्चही. शिवाय शेअर बाजार, म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीबरोबरच सोने आणि चांदी खरेदीतही नागरिक उत्सुकता दाखवत आहेत. परिणामी, शहर आणि ग््राामीण भागातील आर्थिक उलाढालीत वेग आला असून एकप्रकारे सर्वसमावेशक विकासाला चालना मिळत आहे.
‘कन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने मागील महिन्यात एक सर्वेक्षण केले. यावर्षी केवळ राखी पौर्णिमा, गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी या संपूर्ण उत्सव काळात ऑनलाईनवर एकूण उलाढाल सुमारे 4.80 लाख कोटी रुपये मूल्यांवर जाण्याची अपेक्षा आहे. मागील वर्षी हाच आकडा साडेतीन लाख कोटी रुपयांचा होता. यावर्षी ऑफलाईन व्यवहारांत मागील वर्षाच्या तुलनेत 27 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. राखी पौर्णिमेला खर्चात मागील वर्षाच्या तुलनेत 75 टक्के वाढ पाहावयास मिळाली.
एका अंदाजानुसार, उत्सवाच्या काळात देशात सुमारे 70 कोटी ग््रााहक आपल्या क्षमतेनुसार खरेदी करत असतात. दिवाळीला घराची साफसफाई, डागडुजी, रंगकाम केले जाते तेव्हा हार्डवेअर सामान, पेंट, कलर आदींची घरेदी होते. रंगकाम करणाऱ्या कारागिरांना रोजगार मिळतो. शिवाय परदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने भारतात येतात. त्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत 67 टक्के वाढ झाली आहे.एकुणातच भारतात उत्सव हा केवळ धार्मिक श्रद्धेपुरताच मर्यादित नसून आयुष्यात नवीन पर्व सुरू करण्याचा काळदेखील समजला जातो. सोने, घर, वाहन, कपडे आदींच्या खरेदीतून उत्सवाचा आनंद द्विगुणित केला जातो. या आधारे रोजगार वृद्धी, खर्च तसेच आर्थिक घडामोडींना चालना देण्याचे काम होते आणि साहजिकच अर्थव्यवस्थादेखील सक्षम होते.