मल्याळम चित्रपट उद्योगातील महिलांच्या शोषणांच्या तक्रारीची दखल घेत केरळ सरकारने चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश के. हेमा यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय पीठाची स्थापना 2017 मध्ये केली होती. दोन वर्षांपूर्वी या समितीने सरकारकडे अहवाल सादर केला. यात काही धक्कादायक निष्कर्ष होते आणि त्यामुळे सरकारने तो अहवाल सार्वजनिक केला नाही; मात्र गेल्या 19 ऑगस्ट रोजी अहवाल जारी करण्यात आला. यातील गौप्यस्फोटाने बॉलीवूडलाही धक्का बसला. आता सर्वच जण कास्टिंग काऊचचा कलंक लपविण्याचा प्रयत्न करत आहेत.
दक्षिणेतील चित्रपटसृष्टी देशातील दुसरी मोठी सिनेसृष्टी मानली जाते आणि या ठिकाणी कार्यरत महिला कलाकारांचे शोषण नेहमीच चर्चेत राहिलेले आहे. दुसरीकडे बॉलीवूड हा चित्रपट उद्योगातील महत्त्वाचा भाग असल्याने अशा प्रकारच्या घटनांमुळे इथल्या सिनेसृष्टीकडे जास्त लक्ष राहते. यावर चर्चा करण्यासाठी मल्याळम चित्रपट उद्योगाच्या ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकता येईल. मल्याळम चित्रपट उद्योगातील महिलांच्या शोषणांच्या तक्रारींची दखल घेत केरळ सरकारने चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश के. हेमा यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय पीठाची स्थापना 2017 मध्ये केली होती. दोन वर्षांपूर्वी या समितीने सरकारकडे अहवाल सादर केला. यात काही धक्कादायक निष्कर्ष होते आणि त्यामुळे सरकारने तो अहवाल सार्वजनिक केला नाही; मात्र गेल्या 19 ऑगस्ट रोजी अहवाल जारी केला.
बॉलीवूडचा विचार केला तर मोठा निर्माता, फायनान्सरपासून ते त्याचे सर्व सहकारी या कास्टिंग काऊचच्या निमित्ताने फायदे उचलत असतात. बॉलीवूडमधील अनेक निर्मात्यांचे पंटर एखाद्या नवख्या नायिकेला निर्मात्यांचा नवा चित्रपट देण्याच्या निमित्ताने लैंगिक शोषण करत असतात. चित्रपटाच्या भाषेत त्याला ‘तडजोड’ असे म्हणतात. वास्तविक काही निर्माते असेही असतात की, त्यांना नायिकेत फार रस नसतो; पण या गोष्टीने खूप दिलासा मिळत नाही. एखादी नवीन नायिका निर्माता किंवा फायनान्सरच्या नजरेतून वाचली तरी ती दुसर्या ठिकाणी बळी पडते. सर्वच नव्या तारका कास्टिंग काऊचच्या तडाख्यात सापडतीलच असे नाही; पण ज्यांच्याकडून नकार दिला जातो, त्यांना सहजासहजी चित्रपटात ब्रेक मिळत नाही.
काही नायिका अशा असतात की, त्या तडाख्यात सापडल्यानंतर अचानक तडजोड करण्यास तयार होतात. सिनेसृष्टीतील अनेक जण त्याचा पूर्णपणे फायदा उचलतात. तेथे असे काही एजंट असतात की, नव्या आणि प्रस्थापित नायिकांना काम देण्याचे काम करतात. त्यांना निर्माते आणि नवोदित कलाकार असे दोघांकडून कमिशन मिळते. अशावेळी एजंट एखाद्या नायिकेला दुबई किंवा आखाती देशांत काम मिळवून देण्यात यशस्वी ठरतात. एजंटच्या कमाईला बॉलिवूडच्या भाषेत ‘दलाली’ म्हटले जाते. थोडेफार यश मिळताच नव्या कलाकारांची भौतिक सुखासाठी आंधळी स्पर्धा सुरू होते. चांगला फ्लॅट, महागडी मोटार, चांगले राहणीमान, महागडे कपडे या गोष्टी मिळवण्यासाठी नायक-नायिका कामाला लगातात; कारण त्यांना आता ऑटो आणि टॅक्सीत बसून संघर्ष करणे चांगले वाटत नसते. तुम्ही यासंदर्भात तडजोडीसाठी तयार असलेल्या कोणत्याही नव्या कलाकारांशी बोलू शकता. सर्वकाही मिळवण्यासाठी काही नायिका काहीही करायला तयार असतात. अशाच नायिकांवर निर्मात्यांची नजर असते. कास्टिंग काऊचच्या सर्व कथा इथेच जन्माला येतात. मोठे कंत्राट किंवा अन्य कामांच्या माध्यमातून नायिकांकडे पैसा येऊ लागतो; अन्यथा तुम्ही अशा किती नव्या नायिकांचे नाव ऐकले की, त्यांना कामाच्या बदल्यात कोट्यवधी रुपये मिळतात. साधारणपणे वीस ते पंचवीस लाखांचे मानधन दिले जाते. हा पैसा कोणत्या स्रोतातून येतो, हे सविस्तर सांगण्याची गरज नाही. साधारणपणे चित्रपट मिळवण्यासाठी नायकाच्या तुलनेत नायिकांना बर्याच तडजोडी कराव्या लागतात. ही तडजोडही संबंधांच्या मार्गातूनच केली जाते. यासंदर्भात बॉलीवूडच्या किरकोळ निर्मात्याने एक मोठे कटू सत्य सांगितले. चित्रपट हवाय, तडजोड करा. काही नव्या तारका या तडजोडीच्या मार्गावरच वाटचाल करतात व बर्यापैकी यश मिळवतात. काही तर बिनधास्तपणे हा मार्ग निवडतात. अशावेळी त्यांचे दुबईत किंवा परदेशात सहजपणे घर तयार होते.