जो बायडेन : "युरोपने रशियाविरोधात हल्ल्याची तयारी करावी" | पुढारी

जो बायडेन : "युरोपने रशियाविरोधात हल्ल्याची तयारी करावी"

वारसाॅ, पुढारी ऑनलाईन : रशिया-युक्रेन युद्धाला महिना झाला तरी, दोन्हीही देश माघार घेण्याचे भाषा करत नाहीत. अमेरिकेसह पश्चिमकडे सर्व देश रशियाच्या विरोधात आहेत. क्षेपणास्त्रांचा मारा असताना होत असताना युक्रेनजवळ ५० किलोमीटर अंतरावर येऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाला धमकी देताना म्हटले आहे की, “नाटो देशांच्या सीमेमध्ये एक इंचदेखील घुसलात तर त्याचे परिणाम होतील”, असा इशारा रशियाला दिला आहे.

जो बायडेन यांनी पोलंटच्या वारसाॅमध्ये राॅयल कॅसलसमोर भाषण केले. ते म्हणाले, “अमेरिका युक्रेनसोबत आहोत. त्यामुळे व्लादिमीर पुतीन यांनी नाटोच्या सीमेत एक इंचही येण्याचा विचार करू नये. युरोपने रशियाच्या हल्ल्याविरोधात लढण्यासाठी तयारी करावी. रशियाच्या जनतेनेही पुतीन यांना सत्तेवरून हटविण्याचे आवाहान केले आहे. ही व्यक्ती सत्तेत राहू शकत नाही”, असे बायडेन यांनी म्हटलेले आहे.

“युक्रेनवरील व्लादिमीर पुतीन यांचा हल्ला हा खूप काळ चालणार आहे. आता या युद्धात आम्हाला स्पष्ट नजर ठेवण्याची गरज आहे. हे युद्ध काही महिन्यांत किंवा दिवसांत जिंकले जाऊ शकत नाही”, असेही बायडेन यांनी सांगितले. यावेळी युक्रेनचे शरणार्थी उपस्थित होते. यावेळी निर्वासितांना पाहताच जो बायडेन यांनी व्लादिमीर पुतीन यांना ‘कसाई’ संबोधले. इतकंच नाही तर पुतीन यांच्या क्रूरपणावरून बायडेन यांनी खुनी हुकूमशहा आणि युद्धाचा गुन्हेगार म्हटलेले आहे.

हे वाचलंत का?

Back to top button