Russia-Ukraine War : रॉकेटसह क्षेपणास्‍त्र मार्‍याने युक्रेनमध्‍ये हाहाकार, रशियन सैन्‍याने कीव्‍हमधील ६४ किलोमीटर परिसर व्‍यापला | पुढारी

Russia-Ukraine War : रॉकेटसह क्षेपणास्‍त्र मार्‍याने युक्रेनमध्‍ये हाहाकार, रशियन सैन्‍याने कीव्‍हमधील ६४ किलोमीटर परिसर व्‍यापला

कीव्‍ह : पुढारी ऑनलाईन
युध्दाच्‍या पाचव्‍या दिवशी ( दि. २८ फेब्रुवारी) रशियाने रॉकेटसह क्रुझ क्षेपणास्‍त्रांच्‍या केलेल्‍या मार्‍यामुळे युक्रेनमध्‍ये हाहाकार माजला आहे. ( Russia-Ukraine War ) राजधानी कीव्‍ह शहराच्‍या दिशेने रशियन सैन्‍याची आगेकूच करत ६४ किलोमीटर परिसर व्‍यापल्‍याचे सॅटेलाईट फोटोमधून स्‍पष्‍ट झाले आहे. खार्किव्‍ह आणि कीव्‍ह या शहरांच्‍या मध्‍यभागीअसलेल्‍या युक्रेनच्‍या लष्‍करी छावणीवर रशियाने हल्‍ला केला. यामध्‍ये ७० हून अधिक युक्रेनच्‍या सैनिक ठार झाले आहेत. दरम्‍यान, रशिया-युक्रेन युद्‍धासंदर्भात संयुक्‍त राष्‍ट्र मानवाधिकार परिषदेच्‍या आपत्तकालीन बैठकीत भारतासह अन्‍य १३ देशांनी भाग घेतला नाही.

Russia-Ukraine War : रशियाने डागली ५६ रॉकेटसह ११३ क्रुझ क्षेपणास्‍त्र

वृत्तसंस्‍था रायटर्सने दिलेल्‍या माहितीनुसार, युध्दाचा पाचव्‍या दिवशी युक्रेनचे मोठे नुकसान झाले. आतापर्यंत रशियाने ५६ रॉकेटसह ११३ क्रुझ क्षेपणास्‍त्र युक्रेनवर डागली आहेत, अशी माहिती युक्रेनचे राष्‍ट्राध्‍यक्ष वोल्‍दिमीर झेलेन्‍स्‍की यांनी दिली.

कीव्‍हमध्‍ये रशियन सैन्‍याची आगेकूच

राजधानी कीव्‍ह शहराच्‍या दिशेने रशियन सैन्‍याची आगेकूच करत ६४ किलोमीटर परिसर व्‍यापल्‍याचे सॅटेलाईट फोटोमधून स्‍पष्‍ट झाले आहे. कीव्‍हमधील नागरिकांनी शहर सोडावे, असे आवाहन सोमवारीi रशियन सैन्‍याने केले होते. दरम्‍यान, जर्मनीसह अमेरिका, ऑस्‍ट्रेलिया आणि कॅनडा या देशांनी युक्रेनला लष्‍करी मदत करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडीओ :

 

Back to top button