Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर राज ठाकरेंची , म्हणाले… | पुढारी

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर राज ठाकरेंची , म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाचा तिढा अखेर काल सुटला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. एका बाजूला उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या प्रसंगावर राज्यातील जनता हळहळली, तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या कतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर खोचक प्रतिक्रीया देत, चिमटे काढले आहेत.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद महाराष्ट्राला काही नवा नाही. राज यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबाला स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो’. असे म्हणत राज ठाकरेंचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना डिवचले आहे. उद्धव ठाकरे यांना कर्तृत्वाने मुख्यमंत्रीपद मिळाले नाही तर ते नशिबाने मिळाले असून, त्यामुळे त्यांचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू असल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात नऊ दिवसांहून अधिक काळ सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पडदा टाकला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे राजीनामा देत मोठ्या मनाने राज्याचे मुख्यमंत्रीपद सोडले. या मुख्यमंत्र्याला पदावरून उतार होताना, सारा महाराष्ट्र हळहळताना पाहायला मिळाला. तर प्रत्येक व्यक्तीने हा मुख्यमंत्री अनंत काळासाठी महाराष्ट्राच्या आठवणीत राहील. असेही म्हणत, राज्यातील नागरिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल मनात असलेल्या भावनेला वाट करून दिली. मात्र, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर राज ठाकरेंनी केलेल्या ट्विटमध्ये खोचक प्रतिक्रिया देत त्यांचे  चिमटे काढले आहेत.

शिवसेने नेते एकनाथ शिंदे आणि अन्य बंडखोर आमदारांमुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार अल्पमतात आल्यामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक नेते त्यांच्यावर नाराज झाले. अशाप्रकारे मुख्यमंत्री आपल्या नेत्यांचे नेतृत्व करण्यात कमी पडल्याची खंत त्यांच्या अनेक विरोधकांनी बोलून दाखवली आहे.

हेही वाचा:

 

Back to top button