जळगाव : फडणवीसांची रक्षा खडसेंच्या घरी सदिच्छा भेट  | पुढारी

जळगाव : फडणवीसांची रक्षा खडसेंच्या घरी सदिच्छा भेट 

जळगाव; पुढारी वृत्‍तसेवा: मुक्ताईनगर दौर्‍यावर येण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी खासदार रक्षा खडसे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. एकनाथ खडसे हे भाजपमधून बाहेर पडल्‍यानंतर देवेंद्र फडणवीस आणि खडसे यांच्यामध्ये वितुष्‍ट आले असताना या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. 

अधिक वाचा : पवार ॲक्शन मोडमध्ये; राष्ट्रवादीची आज बैठक 

यावेळी आमदार गिरीश महाजन, अशोक कांडेलकर, जिल्‍हा परिषद उपाध्यक्ष पोपटराव तात्या पाटील, खासदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे व अन्य नेते उपस्थित होते. एकनाथ खडसे व देवेंद्र फडणीस यांच्यातील राजकीय वैर हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. मुक्ताईनगर रावेर येथील वादळामुळे झालेल्‍या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज फडणवीस आले होते. या दौर्‍याची सुरुवात करण्‍यापूर्वी त्‍यांनी खासदार रक्षा खडसे यांच्या कोथळी येथील निवासस्थानावर भेट दिली. या सदिच्‍छा भेटीवेळी फडणवीस यांनी रक्षा खडसे यांच्या दोन्ही मुलांची चौकशी केली. या भेटीमुळे नवीन राजकीय संकेत मिळू लागले आहेत. 

अधिक वाचा : शेरनी टिजर : विद्या बालनच्या वनअधिकारी लुकवर चाहते फिदा

रक्षा खडसे यांच्‍या घरी दिलेल्‍या सदिच्‍छा भेटीनंतर मुक्ताईनगरचे नगरसेवक, नगराध्यक्ष, पंचायत समिती सदस्य व इतर कार्यकर्त्यांची भेट घेऊन फडणवीस यांनी दौर्‍याला सुरुवात केली. 

Back to top button