जळगाव : विवाहितेवर अत्याचार; दोघांवर गुन्हा | पुढारी

जळगाव : विवाहितेवर अत्याचार; दोघांवर गुन्हा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ; पतीला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या दोन जणांना पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक वाचा : नाशिक बाजार समितीमध्ये आता स्मार्ट हेल्मेटद्वारे स्क्रीनिंग

सविस्तर माहिती अशी की,  पारोळा तालुक्यातील बोळे येथील ज्ञानेश्वर आनंदसिंग गिरासे हा विवाहितेच्या पतीला दारू पाजण्यासाठी घेवून गेला. त्यानंतर गिरासे पुन्‍हा एकटाच विवाहितेच्या घरी गेले. येथे पतीला ठार मारण्‍याची धमकी देत त्‍याने विवाहितेवर अत्याचार केला. 

अधिक वाचा : चिमुरडीचे अपहरण करुन अत्याचार; परप्रांतिया आरोपीला पोलीस कोठडी

पुन्हा काही दिवसांनी विवाहितेला तिचे अश्‍लील फोटो दाखवले. तुझ्या पतीला सांगून समाजात बदनामी करेन, अशी धमकी देत पुन्‍हा विवाहितेवर अत्याचार केला. हा प्रकार असहाय्य झाल्याने विवाहितेने पारोळा पोलिस ठाण्यात दोन जणांविरूध्द तक्रार दिली. विवाहितेच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि निलेश गायकवाड करीत आहेत.

Back to top button