पुणे महापालिकेत दोन सदस्यीय वॉर्ड असावेत : अजित पवार | पुढारी

पुणे महापालिकेत दोन सदस्यीय वॉर्ड असावेत : अजित पवार

पुणे : पुढारी वृत्तसेवा ; मुबई महापालिकेत एक सदस्यीय वॉर्ड पद्धत आहे. तर पुणे महापालिकेत चार सदस्यीय वॉर्ड पद्धत आहे. भारतीय जनता पक्षाने त्यावेळी सरकारमध्ये त्यांना जे योग्य वाटले त्यानुसार त्यांनी चार सदस्यीय वॉर्ड रचना केली. आता महाविकास आघाडीचे सरकार असून, योग्य निर्णय घेतला जाईल. मात्र, पुण्याबाबत विचार केल्यास माझ्या वैयक्तीक मते दोन सदस्यी वॉर्ड असावा. मात्र या बाबतचा अंतिम निर्णय महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते घेतील, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. 

अधिक वाचा : मराठा आरक्षण : खेळ केलात तर आम्ही गप्प बसणार नाही! संभाजीराजेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे!

पुणे जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. पुणे महापालिकेच्या निवडणुका पुढील वर्षी होणार असून, त्याची राजकीय पक्षांच्या इच्छूकांकडून तयारी सुरु झाली आहे. दुसरीकडे प्रशासनालाही निवडणूक पूर्व तयारी करावी लागणार आहेत. गेल्या निवडणुकीवेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते. त्यावेळी चार सदस्यीय वॉर्ड रचना केली. त्याचा पुण्यात भाजपला फायदा झाला, अशी चर्चा झाली होती. 

अधिक वाचा : ‘शिवराज्याभिषेक दिन’ हा महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्णक्षण : मुख्यमंत्री

आगामी मनपा निवडणुकीत वॉर्ड कसे असावेत, याविषयी उपमुख्यमंत्री पवार यांना विचारले असता, ते म्हणाले, मागील निवडणुकीवेळी भाजपचे सरकार होते. त्यांनी योग्य वाटले त्यानुसार चार सदस्यीय वॉर्ड रचना केली. आता महाविकास आघाडीचे सरकार असून, योग्य निर्णय घेतला जाईल. मात्र, पुण्याबाबत विचार केल्यास माझ्या वैयक्तीक मते दोन सदस्यी वॉर्ड असावा, असे वाटते. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय महाविकास आघाडी सरकारमधील ज्येष्ठ नेते घेतील, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. 

अधिक वाचा : ठाणे जिल्हा ‘अनलॉक’च्‍या तिसर्‍या टप्प्यात

…तर एका बाजूची दुकाने दिवसाआड सुरू 

पुणे आणि पिंपरी येथे सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया टप्याटप्याने सुरू करण्यात येणार आहे. सध्या निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडत आहे. यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. सध्या शहराचा पॉझिटीव्हीटी रेट कमी झाला आहे. याचा अर्थ कोरोना पूर्ण संपला आहे, असा होत नाही, असेही पवार म्‍हणाले.

नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. शहरातील दुकाने सुरू करताना व्यापार्‍यांशी झालेल्या चर्चेनंतर ती सुरू करण्यात आली. मात्र सध्या या दुकानासमोर होणारी गर्दी आणखी वाढत असल्याचे दिसून आल्यास नाईलाजाने एक्का बाजूची दुकाने दिवसाआड सुरू ठेवण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असेही पवार यांनी सांगितले. 

Back to top button