ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवायचे, ही प्रथा योग्य नाही : देवेंद्र फडणवीस | पुढारी

ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवायचे, ही प्रथा योग्य नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पुढारी वृत्तसेवा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (दि.०८) भेट झाली. दरम्यान, या भेटीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली हे बाब चांगली आहे; परंतु आपल्याकडे एक प्रथा पडली आहे, ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवायचे, ती प्रथा योग्य नाही”, असा टाेला फडणवीस यांनी लगावला. अशा चर्चेतून महाराष्ट्राचा चांगला फायदा होईल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.  

अधिक वाचा : खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द

फडणवीस म्‍हणाले , राज्याने केंद्र सरकारकसोबत नेहमी समन्वय ठेवावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले असतील तर ही गोष्ट चांगली आहे. आमचेही नेहमी हेच म्हणणे असते कारण पंतप्रधान राज्याच्या हितासाठी नेहमी सकारात्मक असतात. राज्य आणि केंद्र यांनी संबंध चांगले ठेवले, तर राज्याचा फायदा होतो. आपल्याकडे प्रथा आहे प्रत्येकवेळी केंद्राकडे बोट दाखवायचे, ही प्रथा योग्य नाही. 

अधिक वाचा :टोल नाक्यांवर वाहनधारकांची दुहेरी लूट!

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करणे हे प्रिमॅच्युअर आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात ही भेट प्रिमॅच्युअर आहे. भोसले समितीने मराठा आरक्षण पुन्हा मिळवायचे असेल, तर राज्याने राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करून त्यामार्फत पुढील कारवाई करायला हवी, असे सांगितले आहे; पण ती कारवाई करण्यात आलेली नाही, असेही  फडणवीस यांनी सांगितले.

अधिक वाचा : मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा!

राजकारण निवडणुकीपुरते राहिले पाहिजे. पण इतर काळ समन्वयाची भूमिका असली, तर राज्याचा फायदा होतो. केंद्र सरकारच्या अजेंड्यावर महाराष्ट्र सातत्याने राहिला आहे. त्यासंदर्भात भूमिका योग्य ठेवली, तर महाराष्ट्राचा त्यात फायदाच आहे. असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

 

Back to top button