देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याने आरोग्य कर्मचारी म्हणून घेतली कोरोना लस | पुढारी

देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याने आरोग्य कर्मचारी म्हणून घेतली कोरोना लस

बारामती : पुढारी वृत्तसेवा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आणि माजी मंत्री दिवंगत शोभा फडणवीस यांचे सख्ये नातू अभिनेता तन्मय फडणवीस यांनी घेतलेल्या करोना प्रतिबंध लशीचे बिंग अखेर फुटले आहे.

ट्विटर खात्यावर अभिनेता अशी स्वतःची ओळख देणाऱया तन्मय फडणवीस यांनी हेल्थकेअर वर्कर म्हणून लस घेतल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. तन्मय यांनी लस घेत स्वतःचे छायाचित्र सोशल मिडियावर प्रसारित केले होते. त्यावरून राज्यात चांगलाच वादंग झाला होता.

सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करत माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. 

तन्मय फडणवीस हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आणि माजी मंत्री दिवंगत शोभा फडणवीस यांचे सख्ये नातू आहेत. काही दिवसांपूर्वी कोरोनावरील लस वयाच्या अटीत बसत नसतानाही त्यांनी घेतली होती. तन्मय यांच्या ट्विटर अकौंटवर त्यांनी अभिनेता असल्याचे नमुद केले आहे. परंतु राज्य सरकारकडे लस घेत असताना हेल्थकेअर वर्कर म्हणुन त्यांनी उल्लेख केला असल्याची माहिती यादव यांना माहिती अधिकारात अघड झाली आहे. तन्मय यांनी काही मालिकांमध्ये  भूमिकाही साकारली आहे. परंतु राज्य सरकारकडे लस घेत असताना हेल्थकेअर वर्कर म्हणुन त्यांनी लस घेतली आहे. 

एकीकडे देशात मोठ्या प्रमाणात लसीचा तुडवडा असताना अशा पद्धतीने लस घेणे कितपत योग्य आहे, हा मोठा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला होता. देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला कोरोनाच्या संबंधी वारंवार धारेवर धरले असताना पुतण्याच्या लसीबाबत त्यांनी खरी माहिती का दिली नाही, असा सवाल यादव यांनी केला. 

Back to top button