महाराष्ट्र-अमेरिका यांच्यात कृषीसाठी तांत्रिक सहकार्यासाठी सामंजस्य करार | पुढारी

महाराष्ट्र-अमेरिका यांच्यात कृषीसाठी तांत्रिक सहकार्यासाठी सामंजस्य करार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राज्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्या माध्यमातून प्रमुख पिकांच्या स्पर्धाक्षम आणि सर्व समावेशक मूल्यसाखळी विकसित करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज राज्य सरकारचा कृषी विभाग आणि अमेरिकेचा कृषी विभाग यांच्यात राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.  

महाराष्ट्र आणि अमेरिकेच्या कृषी विभागात परस्पर तांत्रिक सहकार्यासाठी हा सामंजस्य करार झाला. या कराराच्या माध्यमातून कृषि क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी धोरण राबविण्यासाठी महत्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.

 

Back to top button