सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र | पुढारी

सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत समाजबांधवांना अत्यावश्यक असणार्‍या विविध मागण्यांबाबत राज्य सरकारकडून होणार्‍या निर्णयावर आंदोलनाची पुढील दिशा ठरेल. सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन तीव— करण्याचा इशारा खा. संभाजीराजे यांनी दिला.

राजर्षी शाहू समाधी परिसरात मूक आंदोलन झाल्यानंतर मराठा आंदोलन समन्वयकांची राज्यव्यापी बैठक राजर्षी शाहू समाधी स्थळावर बुधवारी झाली. यावेळी खा. संभाजीराजे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाचे आरक्षण रद्द ठरल्याने हा लढा नव्या जोमाने आणि मागील चुका सुधारून करावा लागणार आहे. कोरोनाच्या संकट काळात लोकांचे जीव नाहक धोक्यात घालून मोर्चे काढण्याऐवजी मूक आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव निर्माण करणे गरजेचे आहे. राज्य सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुणे ते मुंबई लाँग मार्चचीही तयारी सुरू आहे.

राज्यातील समन्वयक

बैठकीस करण गायकर, गणेश कदम (नाशिक), अंकुश कदम (नवी मुंबई), रघुनाथ चित्रे, सुनील पाटील (रायगड), धनंजय जाधव (पुणे), रमेश केरे, आप्पासाहेब कुडेकर (संभाजीनगर), महेश गवळी, सज्जनराव साळुंके, जीवन इंगळे (उस्मानाबाद), नीलेश देशमुख (बुलडाणा), महादेव देवसरकर (नांदेड), गंगाधर काळकुटे, पूजा मोरे (बीड), वीरेंद्र पवार (मुंबई), माऊली पवार (सोलापूर), रमेश आंब—े, प्रवीण पिसाळ (ठाणे), व्यंकट शिंदे (लातूर), अ‍ॅड. सुहास सावंत (सिंधुदुर्ग), संजय पाटील, नितीन शिंदे (सांगली), विवेकानंद बाबर, रफीक शेख (सातारा) आदी राज्य समन्वयक उपस्थित होते.

महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकही

आंदोलनात लहान मुले, महिलांसह ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेतला. काळ्या रंगाची वेशभूषा, काळे मास्क आणि भगवे ध्वज घेऊन आबालवृद्ध आंदोलनात सहभागी झाले होते. 

आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग

दरम्यान, मूक आंदोलनात शशिकांत पवार, वसंतराव मुळीक, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सत्यजित कदम, मधुकर रामाणे, सचिन चव्हाण, पुंडलिक जाधव, अ‍ॅड. बाबा इंदुलकर, जयेश कदम, दिलीप देसाई, प्रा. जयंत पाटील, आर. के. पोवार, निवासराव साळोखे, बाबा पार्टे, सुजित चव्हाण, अजित राऊत, महेश जाधव, प्रसाद जाधव, इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, दिलीप पाटील, पै. बाबा महाडिक, राजू सावंत, प्रमोद पाटील, चंद्रकांत पाटील, दिगंबर फराकटे, धनंजय सावंत, उदय भोसले, किशोर घाटगे, अशोक पोवार, रमेश मोरे, चंद्रकांत चिले, दुर्गेश लिंग्रस, राजू लिंग्रस, अनिल कदम, भाऊ घोडके, लालासाहेब गायकवाड, सुरेश जरग, जयकुमार शिंदे, अनिल घाटगे, सचिन घोरपडे, सचिन तोडकर, स्वप्निल पार्टे, कमलाकर जगदाळे, स्वप्निल भांदिगरे, संदीप पाटील, राजू जाधव, संदीप चौगुले, दीपक काटकर, राहुल घाटगे, सुनीता पाटील, गीता हासूरकर, छाया जाधव, गीता चौगले आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

प्रास्ताविक फत्तेसिंह सावंत यांनी, तर सूत्रसंचालन शाहीर शहाजी माळी व शाहीर आझाद नायकवडी यांनी केले. संयोजन विनायक फाळके, हेमंत साळोखे, संजय पवार, योगेश केदार, अमर पाटील, उदय घोरपडे, प्रसन्न मोहिते, संग्राम यादव, सम—ाट कारंडे, चंद्रकांत डेळेकर, सागर पाटील, प्रदीप थोरवत, प्रवीण हुबाळे, सत्यजित आवटे, अजय पाटील, आशुतोष बेडेकर आदींनी केले.

कोल्हापुरात मराठा मूक क्रांती मोर्चानंतर पुन्हा एकदा मराठा आंदोलनाचा एल्गार पाहायला मिळाला. यानिमित्ताने सोशल मीडियावरही मराठा आंदोलनाचा एल्गार दिसत होता. व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर आंदोलनाचे व्हिडीओ, फोटो व त्यासंदर्भाने विविध कमेंटस् प्रचंड प्रमाणात व्हायरल होत होते. 

सकारात्मक निर्णय आल्यास आंदोलनाचे रूपांतर आनंदोत्सवात

आरक्षण मिळेपर्यंत राज्य शासनाने इतर समाजांप्रमाणे विविध योजनांचे पाठबळ मराठा समाजाला तातडीने उपलब्ध करून द्यावे यासह विविध मागण्या राज्य शासनाकडे केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे कोल्हापूर दौर्‍यात नुकतेच सांगितले आहे. तसेच मूक आंदोलनासाठी उपस्थित राज्य सरकारमधील मंत्री व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही याचा पुनरुच्चार केला आहे. याबाबत चर्चेसाठीही तातडीने निमंत्रित केल्याचे खा. संभाजीराजे यांनी सांगितले. मात्र, या बैठकीला मी एकटा जाणार नसून, सकल मराठा समाजातील प्रमुख व तज्ज्ञ लोकांसोबतच राज्य सरकारबरोबर बैठक घेतली जाईल. मुख्यमंत्र्यांसोबतच्या या बैठकीच्या चर्चेतून आंदोलनाची पुढील दिशा ठरेल. दरम्यान, नियोजित आंदोलन सुरूच राहील. राज्य शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत ठोस व सकारात्मक निर्णय घेतल्यास आंदोलनाचे रूपांतर आनंदोत्सवात होईल, असेही खा. संभाजीराजे यांनी सांगितले.

Back to top button