जेव्हा गडकरीच वाहतूक कोंडीत अडकतात! | पुढारी

जेव्हा गडकरीच वाहतूक कोंडीत अडकतात!

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : वाहतूक कोंडीत अडकणे सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन भाग झाला आहे. नागपुरात तर हे दृष्य हमखास पाहायला मिळते. सामान्य माणूस वाहतूक कोंडीत सापडला तर त्याचे सोयरसुतक कोणालाच नसते. पण, शुक्रवारी खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीच वाहतूक कोंडीत अडकले. बऱ्याच वर्षांनी त्यांना सामान्यांसारखा वाहतूक कोंडीत अडकण्याचा अनुभव आला. 

अधिक वाचा : वर्धा : हिंगणघाट येथे ड्रायपोर्ट उभारून ६ डब्ब्यांची रेल्वे देणार

नागपूर येथील पारडी भागातील एका रूग्णालयातील ऑक्सिजन प्लान्टच्या उद्घाटनासाठी जात असताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी वाहतूक कोंडीत अडकले. गडकरींनी स्वत: गाडीतून उतरून वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना मदत केली. 

अधिक वाचा : भाजपला विदर्भात धक्का! बडा नेता मुंबईत येऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

यावेळी रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांची गडकरींनी समजूत काढली. तसेच कंत्राटदाराला पारडीच्या उड्डाणपुलाचे काम लवकरच पूर्ण करण्याचे निर्देश दिले. खाली रस्ता, मध्यात उड्डाणपूल आणि त्याच्या वरच्या भागाला मेट्रो राहणार आहे. याशिवाय ब्रॉडगेज मेट्रोही लवकरच सुरु होणार आहे. काम पूर्ण झाल्यावर वर्धा व भंडारा येथे ३५ मिनिटात जाता येणार आहे.

Back to top button