अलमट्टीबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या जलसंपदा विभागाची बैठक सुरू | पुढारी

अलमट्टीबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या जलसंपदा विभागाची बैठक सुरू

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा 

गेल्‍या वर्षी महाराष्‍ट्रातील सांगली आणि कोल्‍हापूर जिल्‍ह्यात महापुराने थैमान घातले होते. या महापुरात मोठी वित्‍त आणि जीवितहानी झाली होती. शेतीचेही मोठे नुकसान झाले होते. त्‍या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणातून पावसाच्या प्रमाणानुसार योग्‍य नियोजन करून पाणी सोडण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्‍ट्र राज्‍यात समन्वय ठेवणे गरजेचे आहे. त्‍या पार्श्वभूमीवर आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्यासोबत अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक सुरु झाली आहे.

अधिक वाचा : डोळ्याचे पारणे फेडणारा गोकाकचा धबधबा ओसंडून वाहू लागला(Video)

या बैठकीत महाराष्ट्र राज्याच्या भीमा व कृष्णा खोऱ्यातून सोडला जाणारा पाण्याचा विसर्ग व त्याच्या माहितीचे आदान – प्रदान करणे. यासाठीची यंत्रणा, दोन्ही राज्याच्या धरण व्यवस्थापन व पूर नियंत्रणाबाबत संयुक्त आराखडा व कार्यप्रणाली निश्चित करणे. कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणातून पाणी साठवणे व पाणी सोडण्याचे नियोजन, पूर नियंत्रण व व्यवस्थापनासाठी विविध स्तरावरील कार्यपद्धतीची चर्चा व इतर मुद्द्यांबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. 

Back to top button