औरंगाबादेतही लस घेतलेल्या व्यक्तीच्या शरिराला भांडी चिकटण्याचा चमत्कार | पुढारी

औरंगाबादेतही लस घेतलेल्या व्यक्तीच्या शरिराला भांडी चिकटण्याचा चमत्कार

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा ; कोरोनाची लस घेतल्यानंतर नाशिक येथील ७१ वर्षीय व्यक्तीच्या शरीराला धातूचे नाणे, स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा प्रकार नुकताच समोर आला. त्यानंतर रविवारी (दि.१३) औरंगाबादेतही असाच चमत्कार घडला.

अधिक वाचा : ‘…तर पावसाळी अधिवेशन आम्ही चालू देणार नाही’

पुंडलिक नगरातील सामाजिक कार्यकर्ते विष्णू वखरे यांनी २ एप्रिलला पहिला डोस, तर ४ मे रोजी दुसरा डोस घेतलेला आहे. लस घेतल्यानंतर खरंच शरिराला भांडी चिकटतात का, हे पाहण्यासाठी रविवारी त्यांनी हा प्रयोग करून पाहिला असता, त्यांच्या शरीराला धातूची नाणी आणि स्टीलची भांडी चिकटत असल्याचे दिसून आले. 

अधिक वाचा : औरंगाबाद : हतनूर शिवारातील विहिरीत पडून कोल्ह्याचा मृत्यू

मात्र लसीमुळे नव्हे तर अंगावरील घाम, तेलकटपणामुळे असे होत असावे, असे सांगत हा चमत्कार वगैरे काही नाही. कोरोना लसीमुळे असे घडते, असे म्हणणे चुकीचे आहे. लस घेणे हि काळाची गरज आहे, कोणत्याही अफवा, अंधश्रद्धेला बळी न पडता, लस घ्यावी, असे आवाहनही वखरे यांनी केले.

Back to top button