सरकार आहे की तमाशा?; फडणवीसांचा सवाल | पुढारी

सरकार आहे की तमाशा?; फडणवीसांचा सवाल

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राजकीय वर्तुळात सध्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यांच्या पत्रामुळे तसेच, काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे आघाडीमधील अंतर्गत वाद चव्ह्याट्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त करत सरकार आहे की तमाशा असा सवाल केला आहे. 

फडणवीसांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. आघाडीतील अंतर्गत भांडणे म्हणजे नुसती नौटंकी सुरू आहे. ३ पक्षांच्या गोंधळात जनतेला खड्ड्यात पाडू नका असा संताप व्यक्त करत सरकार आहे की तमाशा, असा सवाल फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला. 

तसेच, कोरोनाचा बहाणा पुढे करत सरकारकडून अधिवेशन टाळण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यासमोर आज अनेक मोठे प्रश्न उभे आहेत. पण केवळ २ दिवस अधिवेशन सरकारने प्रस्तावित केल आहे. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घेण्याची मागणी करण्यात आली आहे. पण राज्य सरकारची इच्छा नाही. असा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला. तसेच, सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारादेखील त्यांनी यावेळी दिला आहे. 

Back to top button