महिला धोरण हा एक क्रांतिकारी विचार होता : सुप्रिया सुळे | पुढारी

महिला धोरण हा एक क्रांतिकारी विचार होता : सुप्रिया सुळे

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

महिला धोरण हा एक क्रांतिकारी विचार होता जो शरद पवार यांनी मांडला व मंजूर करुन घेतला याची आठवण आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे.

महिला धोरणाला आज २७ वर्षे पुर्ण होत असून खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत ट्विट करत आपले विचार मांडले आहेत. 

राज्याच्या कानाकोपऱ्यात आज महिला अतिशय चांगल्या पद्धतीने कारभार करताना दिसत आहेत. शासन-प्रशासन चालवित आहेत, ही अतिशय आश्वासक बाब असून हा प्रवाह असाच अखंड सुरु राहील, असा विश्वासही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांना संधीची कवाडे खुली करणाऱ्या महिला धोरणाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत महिलांच्या कार्याची स्तुती केली आहे.

Back to top button