सरकार स्थापण्यासाठी जसे प्रयत्न केले, तसेच मराठा आरक्षणासाठी करा : विनोद पाटील | पुढारी

सरकार स्थापण्यासाठी जसे प्रयत्न केले, तसेच मराठा आरक्षणासाठी करा : विनोद पाटील

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा

सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन ज्याप्रमाणे प्रयत्न केले, तसेच प्रयत्न या महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणासाठी करावे, अशी मागणी मुख्य याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मंगळवारी (दि. २२) केली.

विनोद पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर,  मराठा आरक्षणाचा पुनर्विचार व्हावा यासाठी केंद्र सरकारने पिटीशन याचिका दाखल केलेली आहे. आम्ही मराठा समाजातर्फे पुनर्विचार याचिका दाखल केली आहे,  आज (दि. २२) राज्य सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहेत.

या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य सरकारला एक विनंती केली आहे, विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी एकत्र येत, सरकार बनवले होते, त्यानंतर सरकार स्थापण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने जे प्रयत्न केले, व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मतदान घेऊन सरकार स्थापन केले.  त्याचप्रमाणे मराठा आरक्षणासाठी आता महाविकास आघाडी  सरकारने प्रयत्न करावेत. राज्य आणि केंद्राने मिळून ताकद लावून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही विनोद पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे केली आहे.

Back to top button